AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs LSG सामन्यावर होती विराट कोहलीची करडी नजर, असं इंस्टाग्राम स्टेटस ठेवत कोणाला डिवचलं? नेटकरी म्हणाले…

IPL 2023 : विराट कोहलीच्या इंस्टाग्राम स्टेटस चर्चचा विषय ठरला आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्याचं स्टेटस ठेवण्याचं नेमकं कारण काय? असा प्रश्न नेटकरी करत आहेत.

GT vs LSG सामन्यावर होती विराट कोहलीची करडी नजर, असं इंस्टाग्राम स्टेटस ठेवत कोणाला डिवचलं? नेटकरी म्हणाले...
GT vs LSG : गुजरात विरुद्ध लखनऊ सामना सुरु असताना विराटनं असं ठेवलं स्टेटस, कोणासाठी केलं असावं बरं...
| Updated on: May 07, 2023 | 9:54 PM
Share

मुंबई : आयपील 2023 स्पर्धेतील प्रत्येक सामना आता महत्त्वाचा आहे. कारण शेवटच्या टप्प्यातील सामने प्लेऑफचं गणित ठरवणार आहेत. त्यामुळे खेळाडूंची प्रत्येक सामन्यावर करडी नजर आहे. असंच काहीसं विराट कोहलीचं देखील आहे. कारण प्लेऑफचं गणित टॉपला असलेल्या संघामुळे बदलू शकतं. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या टॉपला असलेल्या संघामध्ये सामना रंगला. हा सामना गुजरातने 56 धावांनी जिंकला. त्यामुळे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानवर असलेल्या संघांना एक संधी आणखी मिळणार आहे.

दुसरीकडे, विराट कोहलीने गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्याचे इंस्टाग्राम स्टेटस ठेवण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. या इंस्टाग्राम स्टेटसचा वेगळाच अर्थ नेटकरी लावत आहे. असं स्टेटस ठेवत गौतम गंभीरला डिवचत असल्याचं सांगितलं जात आहे. या सामन्यातील वृद्धिमान साहा फलंदाजी आणि राशीद खानचा झेल असे दोन स्टेटस त्याने ठेवले आहेत.

या स्टेटसच्या माध्यमातून विराट कोहलीने गौतम गंभीरला डिवल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. कारण लखनऊ विरुद्ध बंगळुरु सामन्यात विराट आणि गंभीरचं भांडण संपूर्ण जगाने पाहिलं आहे. त्यामुळे हे स्टेटस त्याच भांडणाचा एक भाग असल्याचा अंदाज नेटकरी बांधत आहे.

मोठ्या विजयामुळे गुजरातचं प्लेऑफमधलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. दुसरीकडे लखनऊच्या पराभवामुळे बंगळुरु, मुंबई आणि पंजाबला आणखी एक संधी मिळणार आहे. सध्या गुणतालिकेत गुजरात 16 गुणांसह प्रथम स्थानी, चेन्नई 13 गुणांसह दुसऱ्या, लखनऊ 11 गुणांसह तिसऱ्या, राजस्थान 10 गुणंसह चौथ्या, बंगळुरु 10 गुणांसह पाचव्या, मुंबई 10 गुणांसह सहाव्या आणि पंजाब 10 गुणांसह सातव्या स्थानी आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, स्वप्नील सिंग, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती