
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 61 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. ऋतुराज गायकवाड याच्याकडे असणार आहे. तर संजू सॅमसन राजस्थानची धुरा सांभाळणार आहे. राजस्थानला हा सामना जिंकून प्लेऑफचं तिकीट कन्फर्म करण्याची संधी आहे. तर चेन्नई सुपर किंग्ससाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असणार आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नईकडून विजयासाठी जोरदार प्रयत्न पाहायला मिळणार आहेत.
चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये 12 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. चेन्नईने 12 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर राजस्थानने 11 पैकी 8 सामने जिंकलेत. राजस्थान 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आता चेन्नई सामना जिंकून आव्हान कायम ठेवतं की राजस्थान तिकीट कन्फर्म करतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामना रविवारी 12 मे रोजी होणार आहे.
चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे.
चेन्नई विरुद्ध राजस्थान सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.
चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), रचीन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, अजिंक्य रहाणे, शेख राशिद, अरावेली अविनाश, समीर रिझवी, मुकेश चौधरी, रिचर्ड ग्लीसन, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगरगेकर , निशांत सिंधू आणि महेश तीक्षाना.
राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, जोस बटलर, कुलदीप सेन, तनुष कोटियन कोहलर-कॅडमोर, कुणाल सिंग राठोड, नवदीप सैनी, केशव महाराज, शिमरॉन हेटमायर, नांद्रे बर्गर, ध्रुव जुरेल आणि आबिद मुश्ताक.