
आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेत पहिल्यांदाच आमनेसामने आहेत. त्यामुळे या सामन्याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. राजस्थान रॉयल्सने या सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफसाठी अधिकृतरित्या क्वॉलिफाय होणारा दुसरा संघ ठरेल. दुसरीकडे, प्लेऑफसाठी चेन्नई सुपर किंग्सला या सामन्यात विजय मिळवणं खूप गरजेचं आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाला तर मात्र पुढचं गणित खूपच किचकट होऊन जाईल. प्लेऑफचं गणित पाहता हा सामना खऱ्या अर्थाने रंगतदार होईल. गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स संघ 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्स हा संघ 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने संजू सॅमसनचं फलंदाजीला प्राधान्य दिलं आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला की, “आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. एक चांगली विकेट दिसते, दव पडेल अशी आशा आहे. परिस्थिती आणि हवामानातील बदल, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळाला. या गेममध्ये हे सर्व देणे आवश्यक आहे. आम्ही काय काम केले आहे यावर टिकून राहणे आवश्यक आहे. मूलभूत प्रक्रिया करणे आवश्यक आहे, फक्त नियंत्रणाची काळजी घेणे गरजेचं. एक फलंदाज म्हणून कामगिरी करणे आवश्यक आहे, निकाल आनंदी वाटण्यासाठी तुमच्या मार्गावर जाणे आवश्यक आहे. जुरेल संघात परत आला आहे.”
ऋतुराज गायकवाड म्हणाला की, “दव हा घटक नाही, आपण प्रथम फलंदाजी केली की गोलंदाजी काही फरक पडत नाही. खेळपट्टी संपूर्ण सामन्यात सारखीच राहील. अशा परिस्थितीत तुम्हाला मानसिक तयारी करावी लागेल. आम्ही सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षेत्रांबद्दल बोललो. आम्हाला योग्य संतुलन मिळाले, रचिन आणि मी सलामी येऊ. मिशेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. थीक्षाना सॅन्टनरसाठी मैदानात उतरेल. स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःला परत देण्याची गरज आहे. आम्हाला शक्य होणारा प्रत्येक गेम जिंकायचा आहे, तुमची मानसिकता योग्य असायला हवी.”
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थीक्षाना.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शुभम दुबे, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.