GT vs DC IPL 2024 : गुजरातच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कॅप्टन गिल काय म्हणाला?

Shubman Gill GT vs DC IPL 2024 : दिल्ली कॅपिट्ल्सने गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवून सलग दुसरा विजय मिळवला. आपल्या घरच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतरस शुबमन गिल याने गुजरातच्या बॅटिंगबाबत काय म्हटलं जाणून घ्या.

GT vs DC IPL 2024 : गुजरातच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कॅप्टन गिल काय म्हणाला?
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 11:37 PM

दिल्ली कॅपिट्ल्सने गुजरात टायटन्सवर आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 32 व्या सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने आधी टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीने धारदार बॉलिंगच्या जोरावर गुजराला 20 ओव्हरही खेळू दिलं नाही. दिल्लीने गुजरातला 17.3 ओव्हरमध्ये 89 धावांवर ऑलआऊट केलं. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी 90 धावांचं माफक आव्हान मिळालं. दिल्लीने हे आव्हान सहजासहजी पूर्ण केलं. दिल्लीने 90 धावांचं आव्हान हे 8.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दिल्लीने 4 बाद 92 धावा केल्या. दिल्लीचा आयपीएलमधील हा चेंडूंच्या हिशोबाने सर्वात मोठा विजय ठरला.

गुजरातकडून राशिद खान याने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. त्यामुळे गुजरातला 89 धावांपर्यंत पोहचता तरी आलं. मात्र राशिद व्यतिरिक्त एकालाही छोटेखानी पण निर्णायक खेळी करता आली नाही. तर कॅप्टन शुबमन गिलने अहमदाबादच्या या स्टेडियममध्ये कायम तोडफोड खेळी केली आहे. मात्र दिल्ली विरुद्ध शुबमन फ्लॉप ठरला. शुबमनला फक्त 8 धावाच करता आल्या. गुजरातच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर कॅप्टन शुबमन गिल याने काय प्रतिक्रिया दिली? हे जाणून घेऊयात.

शुबमनने गुजरातच्या बॅटिंगबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच खेळपट्टीबाबतही विधान केलं. तसेच लो स्कोअरिंग सामन्यात आव्हान कायम राखायचं असेल तर गोलंदाजांची चमकदार कामगिरीच पाहिजे. तर हा अर्धा टप्पा आहे, आम्ही पुढे चांगली कामगिरी करु, असा आशावद शुबमनने व्यक्त केला.

शुबमन गिल काय म्हणाला?

“आमची फलंदाजी खूपच सरासरी होती. आता पुढे जायचंय आणि जोरदार कमबॅक करणं हे महत्त्वाचं आहे. खेळपट्टी ठिक होती. काही विकेट पाहिले तर त्यात पीचचा काहीच संबंध नव्हता. चुकीचे शॉट सिलेक्शन असं मी म्हणेल. विजयसाठी प्रतिस्पर्धी संघाला 90 धावांचं आव्हान दिलेलं असताना विजयी व्हायचं असेल तर डबल हॅटट्रिक घेतली तरच सामन्यात दबदबा ठेवता येतो”, असं शुबमनने म्हटलं.

तसेच आमचा हा स्पर्धेतील अर्धा टप्पा आहे. आम्ही 3 सामने जिंकले आहेत. आमचे 7 सामने बाकी आहेत. या 7 सामन्यांपैकी आम्ही 5-6 सामने जिंकू, असा आशावादही शुबमन गिल याने पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान व्यक्त केला.

गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन आणि संदीप वॉरियर.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि खलील अहमद.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.