AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs DC Toss : दिल्लीने टॉस जिंकला, मुंबईत 3 बदल, सूर्यकुमार यादवची एन्ट्री

Mumbai Indians vs Delhi Capitals Toss Updates : आयपीएलच्या 17 व्या मोसमातील मुंबई इंडियन्सचा हा चौथा आणि दिल्लीचा पाचवा सामना आहे.

MI vs DC Toss : दिल्लीने टॉस जिंकला, मुंबईत 3 बदल, सूर्यकुमार यादवची एन्ट्री
mi vs dc toss,
| Updated on: Apr 07, 2024 | 3:29 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स या संघांना आमनासामना होणार आहे. या सामन्याला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकला. कॅप्टन ऋषभ पंतने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. पंतने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.

दोन्ही संघात बदल

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स या दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. दिल्ली कॅप्टन ऋषभ पंत याने 2 बदल केलेत. तर हार्दिक पंड्या याने पहिल्या विजयासाठी 3 बदल केले आहेत.  रसिख डार सलाम याच्या जागी ललित यादव याला संधी देण्यात आली आहे. तर मिचेल मार्श दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्याच्या जागी झाय रिचर्डसन याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

तर मुंबई इंडियन्समध्ये सूर्यकुमार यादव याची एन्ट्री झाली आहे. सूर्याच्या एन्ट्रीमुळे नमन धीर याला बाहेर बसवण्यात आलं आहे. तर अफगाणिस्तानचा अनुभवी ऑलराउंडर मोहम्मद नबी आणि रोमरियो शेफर्ड या दोघांनाही संधी देण्यात आली आहे. नबीला डेवाल्ड ब्रेव्हिस याच्या जागी स्थान देण्यात आलंय.तर शेफर्डला मफाकाऐवजी घेतलं आहे.

दिल्लीने टॉस जिंकला

मुंबई-दिल्ली हेड टु हेड रेकॉर्ड्स

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 33 सामन्यात एकमेकांसमोर भिडले आहेत. मुंबईने दिल्ली विरुद्ध 33 पैकी 18 सामन्यात विजय मिळवला आहे.  तर दिल्लीने 15 सामन्यात यशस्वी ठरली आहे. तर दिल्ली कॅपिटल्स गेल्या 5 सामन्यात वरचढ आहे. दिल्लीने 5 पैकी 3 सामने जिंकलेत. वानखेडेवर मुंबई विरुद्ध दिल्ली दोन्ही संघ 8 वेळा भिडले आहेत. मुंबईने त्यापैकी 5 तर दिल्लीने 3 सामने जिंकले आहेत.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.