IPL 2024, MI vs KKR : नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने, हार्दिक पांड्याने निवडली गोलंदाजी

आयपीएल 2024 स्पर्धेतील 60 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. हा सामना औपचारिक आहे असं म्हणायला हरकत नाही. मुंबईचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर कोलकात्याचं प्लेऑफचं ठरलं आहे.

IPL 2024, MI vs KKR : नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने, हार्दिक पांड्याने निवडली गोलंदाजी
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 11, 2024 | 9:13 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. हा सामना औपचारिक असला तरी मुंबई इंडियन्ससाठी स्वाभिमानाची लढाई आहे. या सामना जिंकून मुंबई इंडियन्स या स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढू शकते. दुसरीकडे, कोलकाता आपल्या होमग्राउंडवर मुंबई इंडियन्सला पराभूत करत अधिकृतरित्या प्लेऑफमधील स्थान निश्चित करेल. हे दोन्ही संघ आयपीएलमध्ये 33वेळा भिडले आहेत. त्यात 23 वेळा मुंबई इंडियन्स, तर 10 वेळा कोलकात्याने बाजी मारली आहे. ईडन गार्डनवरही मुंबईचा पत्ता चालला आहे. या मैदानात दोन्ही संघ 10वेळा आमनेसामने आले आहेत. यात मुंबई इंडियन्सने 7, तर कोलकात्याने 3 वेळा विजय मिळवला आहे. दरम्यान आजच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेकीचा कोल जिंकत प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं आहे. आता मुंबई इंडियन्स कोलकात्याने दिलेलं आव्हान पूर्ण करतं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, “आम्ही गोलंदाजी करणार आहोत. फक्त खेळपट्टी कशी काम करते ते बघायचे आहे. दोन दिवसांपासून ते कव्हरखाली आहे. आम्हा सर्वांना आकडेवारीची माहिती आहे, परंतु तुम्हाला त्या दिवशी चांगले क्रिकेट खेळावे लागेल.” कोलकाता नाईट रायडर्स कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, “मी पुन्हा एकदा नाणेफेक जिंकण्याचा प्रयत्न केला. तरीही तो हेड्स म्हणून खाली आल. नाणेफेक अशा खेळांसाठी ते महत्त्वपूर्ण आहे. तरी ती सबब घेणार नाही. आम्हाला आमच्या टीमच्या पुढे जाण्यासाठी क्यू हवा आहे. नितीश संघात आला आहे, तर अंगकृष बाहेर गेला आहे .”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती