
निकोलस पूरन आणि कॅप्टन केएल राहुल या दोघांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं आहे. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 214 धावा केल्या. निकोलस पूरन आणि केएल राहुल या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र त्यानंतर लखनऊने सलग 3 बॉलमध्ये 3 विकेट्स गमावल्या. त्यामुळे लखनऊची घसरण झाली. मात्र अखेरच्या क्षणी आयुष बदोनी आणि कृणाल पंड्या या दोघांनी केलेल्या छोटेखानी खेळीमुळे लखनऊला 200 पार मजल मारता आली.
देवदत्त पडीक्कल भोपळाही फोडू शकला नाही. लखनऊला 1 धाव असताना पहिला झटका लागला. त्यानंतर मार्कस स्टोयनिस आणि केएल राहुल या दोघांनी 48 धावांची भागीदारी केली. त्यानंतर 49 धावा असताना लखनऊ दुसरी विकेट गमावली. स्टोयनिस 18 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर दीपक हुड्डा 11 रन करुन आऊट झाला. नेहल वढेरा याने दीपकचा कडक कॅच घेतला. त्यामुळे लखनऊची 3 बाद 69 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर निकोलस पूरन आणि केएल राहुल या दोघांनी झंझावाती खेळी करत सामन्याचा चेहरामोहरा बदलला.
निकोलस पूरन आणि केएल राहुल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. या दरम्यान निकोलस पूरन आणि केएल राहुल या दोघांनी अर्धशतकं ठोकली. दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. मुंबई विकेट्सच्या शोधात होती. नुवान तुषारा याने ही सेट जोडी फोडली. नुवानने सामन्यातील 17 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर निकोलस पूरन याला सूर्यकुमार यादव याच्या हाती कॅच आऊट केलं. निकोलसने 29 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने 75 धावांची खेळी केली.
नुवानने त्यानंतर पुढील बॉलवरच अर्शद खान याला एन तुषारा याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर पीयूष चावला 18 वी ओव्हर टाकायला आला. पीयूषने केएल राहुल याला 55 धावांवर एन तुषारा याच्या हाती कॅच आऊट केलं. केएलने 41 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह 55 धावांची संयमी खेळी केली. त्यानंतर कृणाल पंड्या आणि आयुष बदोनी या जोडीने नाबाद राहत लखनऊला 200 पार पोहचवलं. बदोनीने 10 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 फोरसह नाबाद 22 धावा केल्या. तर कृणाल 7 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह 12 रन्सवर नॉट आऊट राहिला. तर मुंबईकडून पीयूष चावला आणि एन तुषारा या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि नुवान तुषारा.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान.
मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेअर्स : रोहित शर्मा, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, आकाश मधवाल आणि कुमार कार्तिकेय.
लखनऊ सुपर जायंट्स इम्पॅक्ट प्लेअर्स : नवीन-उल-हक, ॲश्टन टर्नर, मणिमरन सिद्धार्थ, प्रेरक मंकड आणि कृष्णप्पा गौथम.