
मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकला. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईची पहिले बॉलिंग असल्याने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह विरुद्ध रनमशीन विराट कोहली यांच्या लढाईकडे लागलं होतं. मात्र या लढाईत पुन्हा एकदा मुंबईचा जसप्रीत बुमराह हा विराटवर वरचढ ठरला आहे. जसप्रीत बुमराह याने विराट कोहली याला आऊट करत आरसीबीला पहिला धक्का देत मुंबईसह आपलंही विकेटचं खातं उघडलं. बुमराहने आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली याला आऊट करण्याची पाचवी विकेट ठरली.
जसप्रीत बुमराहने विराटला सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर विकेटकीपर ईशान किशन याच्या हाती कॅच आऊट केलं. विराटने फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटला इनसाईड एज लागला. स्टंप मागे असलेल्या ईशान किशन याने हुशारीने हा कॅच घेतला. विराटला 9 बॉलमध्ये 33.33 च्या स्ट्राईक रेटने 3 धावा करुन मैदानाबाहेर जावं लागलं. विराट आऊट झाल्याने आरसीबाला मोठा फटका बसला. तसेच विराट टीमला चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरला.
दरम्यान विराट कोहली याने या सामन्याआधी जसप्रीत बुमराह याच्या 92 चेंडूंचा सामना केला आहे. विराटने बुमराह विरुद्ध 92 बॉलमध्ये 140 धावा केल्या आहेत. विराटने बुमराहला 15 चौकार आणि 5 सिक्स ठोकले आहेत. विराटने 152.2 च्या स्ट्राईक रेट आणि 35 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर बुमराहने 4 वेळा आऊट केलं आहे. अर्थात बुमराहने विराटला 23 चेंडूनंतर बाद केलं आहे.
विराट बुमराहसमोर पाचव्यांदा आऊट
Kohli vs Bumrah in IPL:
95 balls
140 runs
Five dismissals
SR 147.36pic.twitter.com/dpE6QxhTzo— CricketGully (@thecricketgully) April 11, 2024
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी आणि आकाश मधवाल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.