MI vs SRH Toss : हैदराबाद विरुद्ध टॉस जिंकला, मुंबईची पहिले बॅटिंग की फिल्डिंग?

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Toss : प्लेऑफच्या हिशोबाने हैदराबादसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबईसाठी हा सामना घरच्या मैदानात असल्याने प्रतिष्ठेचा आहे.

MI vs SRH Toss : हैदराबाद विरुद्ध टॉस जिंकला, मुंबईची पहिले बॅटिंग की फिल्डिंग?
srh vs mi toss ipl 2024Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 7:38 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 55 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघात सामना होत आहे. हा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमध्ये पार पडणार आहे. हार्दिक पंड्याच्या खांद्यावर मुंबई इंडियन्सचं नेतृत्व आहे. तर पॅट कमिन्स हैदराबादची धुरा सांभाळत आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेत हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.

पलटणला वचपा घेण्याची संधी

मुंबई विरुद्ध हैदराबाद हे दोन्ही संघ आयपीएलच्या 17 व्या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने आहेत. याआधी दोन्ही संघांचा आमनासामना हा 27 मार्च रोजी झाला होता. तेव्हा हैदराबादने मुंबईवर 31 धावांनी विजय मिळवला होता. हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 278 धावांचा पाठलाग करताना मुंबईला 5 विकेट्स गमावून 246 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. त्यामुळे आता मुंबई हैदराबादला पराभूत करुन वचपा घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

आकडेवारी कुणाच्या बाजूने?

मुंबई विरुद्ध हैदराबाद हे दोन्ही संघ आयपीएलमध्ये एकूण 22 वेळा भिडले आहेत. या 22 सामन्यांमध्ये मुंबईचा बोलबाला राहिला आहे. मुंबईने हैदराबाद विरुद्ध 12 सामन्यात विजय मिळवलाय. तर हैदराबादला 10 वेळा विजय मिळवण्यात यश आलंय. त्यामुळे आकडेवारीच्या हिशोबाने मुंबईच सरस राहिली आहे.

दोन्ही टीममध्ये बदल

मुंबईकडून अंशुल कंबोज याने पदार्पण केलंय. अंशुल कंबोज याचा गेराल्ड कोएत्झी याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. तर हैदराबाद टीममध्ये माजी कर्णधार एडन मारक्रम याच्या जागी मयंक अग्रवाल याचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबईने टॉस जिंकला

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.

Non Stop LIVE Update
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.