“मुंबईचा राजा रोहित शर्मा”, क्रिकेट चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी, व्हीडिओ व्हायरल
Rohit Sharma Ipl 2024 : मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 17 व्या हंगामातील आपल्या घरच्या मैदानातील पहिला सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार आहे.

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 14 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स भिडणार आहेत. या सामन्याला वानखेडे स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. मुंबई आणि राजस्थान या दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना आहे. मुंबई-राजस्थानची उलट स्थिती आहे. मुंबईने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात दोन्ही सामने गमावले आहेत. तर संजू सॅमसनच्या कॅप्टन्सीत राजस्थान दोन्ही सामने जिंकलीय. त्यामुळे राजस्थान मुंबई विरुद्ध जिंकून विजयी हॅटट्रिकची संधी आहे. तर मुंबईसमोर विजय खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे.
“मुंबईचा राजा रोहित शर्मा”
मुंबई इंडियन्सचा हा या हंगामातील घरच्या मैदानातील पहिलाच सामना आहे. त्यामुळे आपल्या मुंबईला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. अशात एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हीडिओ वानखेडे स्टेडियमच्या बाहेरचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
व्हीडिओत नक्की काय?
या व्हायरल व्हीडिओमध्ये मुंबई इंडियन्सचे चाहते दिसून येत आहे. मुंबईच्या जर्सीत असलेले चाहते एकामागोमाग एक असे रांगेत आहेत. त्यातला एका उत्साही चाहता आहे जो पूर्णपणे निळ्या रंगात दिसतोय. हा चाहता “मुंबईचा राजा रोहित शर्मा” अशा घोषणा देत आहे. तर या चाहत्याच्या मागे इतर क्रिकेट समर्थकही जोरदार घोषणा देत आहेत. या व्हीडिओवर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. “क्रिकेट चाहत्यांच्या रिएक्शन पाहण्यासाठी हा सामना पाहावा लागेल”, असं एका क्रिकेट चाहत्याने म्हटलं.
रोहितच्या चाहत्यांचा व्हीडिओ व्हायरल
Fans started coming outside Wankhede stadium with ‘ Mumbai cha Raja Rohit Sharma ‘ chants 🔥
Imagine the scenes during match 🤯 pic.twitter.com/THo3YKisDm
— Nisha (@NishaRo45_) April 1, 2024
राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोवमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, आर अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, केशव महाराज, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.
