AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, PBKS vs CSK : पंजाब किंग्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, कर्णधार सॅम करन म्हणाला..

आयपीएल 2024 स्पर्धेतील 53वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. धर्मशाळेतील एचपीसीए स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्स गुणतालिकेत पाचव्या, तर पंजाब किंग्स सातव्या स्थानावर आहे.

IPL 2024, PBKS vs CSK : पंजाब किंग्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, कर्णधार सॅम करन म्हणाला..
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 05, 2024 | 3:09 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफच्या दृष्टीने चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघांना प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. आतापर्यंत दोन्ही संघ 29 वेळा आमनेसामने आले आहेत. यात 15 वेळा चेन्नई सुपर किंग्सने, तर 13 वेळा पंजाब किंग्सने बाजी मारली आहे. तर एक सामना टाय झाला आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ पहिल्यांदा चेन्नईच्या चेपॉक मैदानात भिडले होते. यावेळी पंजाब किंग्सने 7 गडी राखून चेन्नईवर मात केली होती. धर्मशाळेत हे दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. यात चेन्नई आणि पंजाबने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि सॅम करनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करन म्हणाला की, “आम्ही गोलंदाजी करणार आहोत. दिवसाचा खेळ आहे त्यामुळे धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही त्याच संघासोबत खेळणार आहोत. आम्ही एकाच संघासह दोन खरोखर चांगले विजय मिळवले आहेत. संपूर्ण सामन्यात स्थिती अगदी योग्य असली पाहिजे. मग ती फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण असो.”

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला, “आम्ही आमच्या प्रक्रियेत अडकलो आहोत आणि छोट्या छोट्या गोष्टी बरोबर करत आहोत. आम्ही विरोधकांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहत नाही, आम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करतो आणि आम्ही काय करू शकतो ते पाहतो. या पर्वात अनेक दुखापती, फ्लूमुळे सक्तीचे बदल झाले आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या संघात बदल करावा लागला आहे. मी म्हणेन की 10 टॉस हरलो पण 5 गेम जिंकणे सकारात्मक आहे. फिझच्या जागी सॅन्टनर संघात आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे.

Follow Us
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...