AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 PBKS vs RR Live Streaming : पंजाबसमोर राजस्थानचं आव्हान, कोण परतणार विजयी ट्रॅकवर?

punjab kings vs rajasthan royals Live Streaming : पंजाब आणि राजस्थान या दोन्ही संघांनी आपला अखेरचा सामना गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असा असणार आहे.

IPL 2024 PBKS vs RR Live Streaming : पंजाबसमोर राजस्थानचं आव्हान, कोण परतणार विजयी ट्रॅकवर?
PBKS VS RR Dhawan and sanjuImage Credit source: BCCI/IPL
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 12, 2024 | 4:42 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 27 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने भिडणार आहेत. शिखर धवन याच्याकडे पंजाब किंग्सचं नेतृत्व आहे. तर संजू सॅमसन राजस्थानची धुरा सांभाळणार आहे. पंजाब आणि राजस्थान या दोन्ही संघांचा हा सहावा सामना आहे. राजस्थानने सलग 4 सामने जिंकले. त्यानंतर पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानचा विजय रथ रोखला. राजस्थान 4 विजय आणि 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी आहे. तर दुसऱ्या बाजूला पंजाबने 5 पैकी 3 सामने गमावलेत तर 2 जिंकलेत. पंजाब 2 विजयासह आठव्या क्रमांकावर आहे. राजस्थान आणि पंजाब दोन्ही संघांनी आपला अखेरचा सामना गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना केव्हा?

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना शनिवारी 13 एप्रिल रोजी होणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना कुठे?

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना हा महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंडीगढ येथे होणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना किती वाजता सुरु होणार?

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहता येईल.

पंजाब किंग्स टीम : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हरप्रीत सिंग भाटिया, प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, जितेश शर्मा, सॅम कुरान, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, शिवम सिंग, सिकंदर रझा, अथर्व तायडे, ख्रिस वोक्स, अर्शदीप सिंग, राहुल चहर, नाथन एलिस, हरप्रीत ब्रार, विद्वथ कवेरप्पा, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, प्रिन्स चौधरी, आशुतोष शर्मा, विश्वनाथ सिंग आणि तनय त्यागराजन.

राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, शुबम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, रविचंद्रन अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक, तनुष कोटियन आणि केशव महाराज.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान