
आयपीएलच्या 17 व्या मोसमात रविवारी 12 मे रोजी 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. दोघांना प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. जिंकणारी टीम स्पर्धेत कायम राहील. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे दोन्ही संघात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.
दिल्ली आणि आरसीबी दोन्ही संघांचा हा 13 वा सामना असणार आहे. दिल्लीने आतापर्यंत या हंगामात 12 सामने खेळले आहेत. या 12 पैकी 6 सामन्यात दिल्लीने विजय मिळवलाय. तर तितक्याच सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. दिल्ली 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर आरसीबी 5 विजय 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. आता उभयसंघांमध्ये आव्हान कायम राखण्यासाठी या सामन्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.
आरसीबी विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामना 12 मे रोजी होणार आहे.
आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु येथे होणार आहे.
आरसीबी विरुद्ध दिल्ली सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.
आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार विशक, मयंक डागर, ग्लेन मॅक्सवेल, आकाश दीप, रीस टोपले, टॉम कुरन, अल्झारी जोसेफ, मनोज भंडागे, सौरव चौहान, राजन कुमार आणि हिमांशू शर्मा.
दिल्ली कॅपिटल्स टीम : अक्षर पटेल (कॅप्टन), शाई होप (विकेटकीपर), जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद, रसिक दार सलाम, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, सुमित कुमार, ललित यादव, पृथ्वी शॉ, लिझाद विल्यम्स, डेव्हिड वॉर्नर, रिकी भुई, झ्ये रिचर्डसन, ॲनरिक नॉर्टजे, यश धुल, विकी ओस्तवाल आणि स्वस्तिक चिकारा.