IPL 2024, RCB vs SRH : पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने सगळंच केलं उघड, म्हणाला…

| Updated on: Apr 26, 2024 | 12:04 AM

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादला दणका दिला आहे. बंगळुरुने हैदराबादला 35 धावांनी पराभूत केलं आहे. गुणतालिकेत फार काही वर खाली झालं नाही. मात्र नेट रनरेटवर फरक पडलेला दिसून आलं आहे. या सामन्यातील पराभवानंतर पॅट कमिन्सने मन मोकळं केलं.

IPL 2024, RCB vs SRH : पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने सगळंच केलं उघड, म्हणाला...
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 7 गडी गमवून 206 धावा केल्या आणि विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना सनरायझर्स हैदराबादचा डाव पत्त्यासारखा कोसळला. ज्या खेळाडूंवर भरवसा होता त्या खेळाडूंनी ऐनवेळी माती खाल्ली. त्यामुळे सामन्यात पकड मिळवताच आली नाही. मोक्याच्या क्षणी विकेट गमवल्याने सामन्यावर बंगळुरुने पूर्णपणे पकड मिळवली. सनरायझर्स हैदराबादल 20 षटकात 8 गडी गमवून 171 धावा करता आल्या. बंगळुरुने हैदराबादला 35 धावांनी पराभूत केलं. या पराभवामुळे गुणतालिकेवर फार काही बदल झाला नाही. हैदराबादचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे, तर बंगळुरुला दहाव्या स्थानावरच समाधान मानावं लागलं आहे. पण या सामन्यातील निकालामुळे पुढे जाऊन प्लेऑफचं गणित आणखी रंगतदार होणार यात शंका नाही. या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाराजी व्यक्त केली आहे.

हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, “आजची रात्र निराशाजनक आहे. काही षटकांमध्ये खूपच धावा आल्या आणि दुर्दैवाने आम्ही आमच्या डावात काही विकेट गमावल्या. आम्ही प्रथम फलंदाजी करणार होतो, ते आमच्यासाठी काम करत असल्याचे दिसते. शेवटच्या काही विजयांपूर्वी आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो. आम्ही त्या वाटेला गेलो नाही. संघाशी मी जिंकल्यानंतर बोलतो, डॅन (व्हिटोरी) पराभवानंतर बोलतो. संघ खरंच चांगला खेळत आहे, हे T20 क्रिकेट आहे, तुम्ही प्रत्येक गेम जिंकणार नाही. त्यामुळे याकडे जास्त लक्ष देऊ नका.आमचा एक मजबूत संघ आहे. पण प्रत्येक खेळात ते चालणार नाही. एक किंवा दोन गेम आमच्या पारड्यात पडले नाहीत तरीही आम्ही एकूण चांगली खेळी करण्यात यशस्वी झालो. यातून धडा घेऊन पुढे जायला हवं. ”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इम्पॅक्ट प्लेयर्स: स्वप्नील सिंग

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टी नटराजन.

सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेयर्स:  ट्रॅव्हिस हेड.