IPL 2024, RCB vs SRH : विराट-पाटीदारची अर्धशतकी खेळी, आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान

| Updated on: Apr 25, 2024 | 9:10 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने 20 षटकात 7 गडी गमवून 206 धावा केल्या.

IPL 2024, RCB vs SRH : विराट-पाटीदारची अर्धशतकी खेळी, आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान
Image Credit source: Twitter
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील 41व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात टॉस जिंकत आरसीबीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 7 गडी गमवून 206 धावा केल्या आणि विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं. कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी आक्रमक पण सावध सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 48 धावांची भागीदारी केली. फाफने टी नटराजनच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला आणि मार्करमच्या हाती झेल देऊन बसला. फाफने 12 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 25 धावा केल्या. त्यानंतर आलेला विल जॅक्स काही खास करू शकला नाही. 9 चेंडूंचा सामना केला आणि 6 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदारची जोडी जमली. तिसऱ्या गड्यासाठी दोघांनी 65 धावांची भागीदारी केली. यात रजत पाटीदारने 20 चेंडूत 50 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 5 षटकार मारले.

विराट कोहलीनेही आपलं अर्धशतक झळकावलं. पण त्याची खेळी टी20 च्या तुलनेत खूपच संथ होती. त्याने 118.60 च्या स्ट्राईक रेटने 43 चेंडूत 51 धावा केल्या. याच चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर अब्दुल समादने त्याचा झेल घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवला. महिपाल लोमरारकडून बऱ्याच अपेक्षा होत्या मात्र फक्त 7 धावा केल्या आणि बाद झाला. दिनेश कार्तिकला बाद करण्यात पॅट कमिन्सला यश आलं. अब्दुल समादने झेल घेतला आणि त्याचा डाव 11 धावांवर संपुष्टात आला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इम्पॅक्ट प्लेयर्स: सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, हिमांशू शर्मा, विजयकुमार विषक, स्वप्नील सिंग

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टी नटराजन.

सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेयर्स: उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, ट्रॅव्हिस हेड.