RR vs DC, IPL 2024 : रियान परागची झंझावाती खेळी, दिल्लीसमोर 186 रन्सचं टार्गेट

RR vs DC IPL 2024 1st Innings Highlights In Marathi : रियान पराग याने धमाकेदार आणि विस्फोटक खेळी केली. त्यामुळे राजस्थानला दिल्लीसमोर 186 धावांचं आव्हान ठेवता आलं.

RR vs DC, IPL 2024 : रियान परागची झंझावाती खेळी, दिल्लीसमोर 186 रन्सचं टार्गेट
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 10:35 PM

रियान पराग याच्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या नवव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी धावांचं 186 आव्हान दिलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 185 धावा केल्या. राजस्थानकडून रियान पराग याने सर्वाधिक धावा केल्या. तर इतर फलंदाजांनी छोटेखानी मात्र निर्णायक खेळी केली. त्यामुळे राजस्थानला 180 पार मजल मारता आली. आता राजस्थानचे गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करतात की दिल्ली आपला पहिला विजय मिळवते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

राजस्थानची बॅटिंग

राजस्थानकडून रियान पराग याने सनसनाटी खेळी केली. रियानने 186.67 च्या स्ट्राईक रेटने 45 बॉलमध्ये नाबाद 84 धावांची खेळी केली. रियानच्या या खेळीत 6 खणखणीत सिक्स आणि 7 चौकारांचा समावेश होता. रियान व्यतिरिक्त इतरांनीही योगदान दिलं, मात्र त्यांना मोठी खेळी करता आली नाही. जॉस बटलर याने 11 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल 5 धावांवर बाद झाला. कॅप्टन संजू सॅमसन 15 धावांवर बाद झाला. आर अश्विन याने 19 बॉलमध्ये 3 सिक्ससह 29 धावा करुन माघारी परतला. ध्रुव जुरेल याने 20 धावा जोडल्या. तर शिमरॉन हेटमायर याने नाबाद 14 धावांची खेळी केली.

तर दिल्ली कॅपिट्ल्सकडून एकूण 5 गोलंदाजांनी प्रत्येकी 4 ओव्हर टाकल्या. या 5 गोलंदाजांना 1-1 विकेट मिळाली. खलील अहमद, मुकेश कुमार, एनरिच नॉर्तजे, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या 5 जणांच्या खात्यात प्रत्येकी 1-1 विकेट गेली.

रियान परागची विस्फोटक खेळी

दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर ), डेव्हीड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

राजस्थान रॉयल्स प्लेईंग इलेव्हन : संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा आणि आवेश खान.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.