
आयपीएल स्पर्धा आता हळूहळू रंगतदार वळणावर पोहोचत आहे. प्लेऑफसाठीची चुरस आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. काही संघाची बाजू सध्या तरी भक्कम आहे, तर काही संघ प्लेऑफमधील स्थान मिळवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. एकंदरीत असं सर्व चित्र असताना आयपीएलमधील 24 वा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. सध्या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सची गाडी सुसाट सुटली आहे. चार पैकी चार सामने जिंकत अव्वल स्थान गाठलं आहे. तर गुजरात टायटन्सची स्थिती कधी बरी, तर कधी एकदमच वाईट होताना दिसत आहे. राजस्थानच्या सवाई मानसिंग इंदूर स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स पाचवेळा आमनेसामने आले आहेत. यात गुजरातने 4 वेळा, तर राजस्थानने फक्त एकदाच विजय मिळवला आहे.
राजस्थान विरुद्ध गुजरात सामन्यात काही खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावतील. यात राजस्थान रॉयल्सचे 6 आणि गुजरात टायटन्सच्या 5 खेळाडूंचा समावेश आहे. राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलर, संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्टचा समावेश आहे. तर गुजरात टायटन्सकडून शुबमन गिल, राशीद खान, डेविड मिलर, जोशुआ लिटल आणि राहुल तेवतिया यांचा समावेश आहे.
जयपूरची खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी आहे. सवाई मानसिंग स्टेडियम मोठं असून मोठा स्कोअर उभारणं कठीण आहे. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला फायदा होईल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. तसेच मधल्या षटकात फिरकीपटूही कमाल करू शकतात. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनी 357, तर फिरकीपटूंनी 182 विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या डावातील धावांची सरासरी ही 161 आहे.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, एसव्ही सॅमसन (कर्णधार), आर पराग, डीसी जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, एन बर्गर, आवेश खान, युझवेंद्र चहल
गुजरात टायटन्स : शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, केन विल्यमसन, बीआर शरथ (विकेटकीपर), विजय शंकर, डीजी नळकांडे, आर तेवतिया, रशीद खान, यूटी यादव, एसएच जॉन्सन, नूर अहमद.