Epstein Files : एपस्टीन फाईल्समध्ये या प्रसिद्ध उद्योगपतीच्या नावाचाही समावेश, उडाली मोठी खळबळ, वाचा संपूर्ण यादी
एपस्टीनशी फाइलशी संबंधित कागदपंत्र सार्वजनिक करण्यात आल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे, या प्रकरणात आतापर्यंत अनेक बड्या राजकीय नेत्यांचे तसेच अभिनेत्यांचे नावं समोर आले आहेत.

अमेरिकेतला कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित असलेल्या प्रकरणाने सध्या अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी रात्री जेफ्री एपस्टीनशी संबंधित तब्बल 3 लाख कागदपत्रं सार्वजनिक केली आहेत. हे कागदपत्रं सात सेटमध्ये जारी करण्यात आले असून, या कागदपत्रांमध्ये हजारो छायाचित्रांचा देखील समावेश आहे. ही छायाचित्र सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरली आहेत. ही कागदपत्रं सार्वजनिक होताच अनेक राजकीय नेते, अभिनेते आणि जागतिक स्थरावरील दिग्गजांची नावं चर्चेत आली आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागानुसार सुरुवातील एपस्टीन फाइल्सशी संबंधित चार सेट जारी करण्यात आले होते. त्यानंतर तीन तासांनी आणखी चार सेट सर्वाजनिक करण्यात आले आहेत.
जवळपास 3,500 हून अधिक फाईल्सचा यामध्ये समावेश आहे, 2.5 GB डेटाच्या या फाईल्स असल्याची माहिती समोर येत आहे. या दस्ताऐवजामध्ये छायाचित्र, मेल, चौकशीच्या नोट्स आणि इतर रेकॉर्डचा समावेश आहे. मात्र या रेकॉर्डवरून अद्याप हे स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये की, हे फोटो नेमके कुठे घेण्यात आले आणि कोणत्या ठिकाणी घेण्यात आले आहेत. या छायाचित्रामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या अनेक फोटोंचा समावेश आहे. ज्यामध्ये बिल क्लिंटन हे मुलींसोबत स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करताना आणि पार्टी करताना दिसून येत आहे. हे फोटो समोर येताच बिल क्लिंटन यांनी आपल्याला या प्रकरणात बळीचा बकरा बनवलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ही फाईल्स ओपन होताच खळबळ उडाली असून अनेक मोठे नेते अडचणीत सापडले आहेत. ट्रम्प यांचं देखील या प्रकरणात नाव समोर आलं आहे, त्यांचा फोटो देखील समोर आला आहे.
आतापर्यंत किती दिग्गजांचं नाव समोर आलं?
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन
पॉप स्टार मायकल जॅक्सन
ब्रिटनचे प्रिंन्स अॅड्र्यू आणि त्यांची पत्नी सारा फर्ग्यूसन
प्रसिद्ध निवेदक – ओप्रा विन्फ्रे
हॉलिवूड अभिनेता केविन स्पेसी आणि क्रिस टकर
अब्जाधिश आणि प्रसिद्ध उद्योगपती रिचर्ज ब्रॅन्सन
