AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Epstein Files मध्ये अजून काय मसाला, काय माल? तुम्हीच शोधा आणि व्हा शोध पत्रकार, इथं क्लिक करुन मिळवा उत्तर

Epstein Files DOJ: एपस्टीन फाईल्सने सध्या जगभरात खळबळ माजवली आहेत. अनेक दिग्गज, नामचीन, प्रसिद्ध, लोकप्रिय आणि अशा अनेक लोकांची नावं या फाईल्समध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या फाईल्समध्ये अजूनही माहिती असून येत्या एका दोन आठवड्यात ती सार्वजनिक करण्यात येणार आहे. पण सध्या जो स्फोट झाला, त्यामुळे अमेरिकन समाज हादरला आहे.

Epstein Files मध्ये अजून काय मसाला, काय माल? तुम्हीच शोधा आणि व्हा शोध पत्रकार, इथं क्लिक करुन मिळवा उत्तर
एपस्टीन फाईल्स, अमेरिकन न्याय विभाग
| Updated on: Dec 20, 2025 | 5:06 PM
Share

US Justice Department: एपस्टीन फाईल्सने जगात खळबळ उडवली आहे. जगातील अनेक धुरंधर( Dhurandhar) यामध्ये असल्याचे समोर येत आहे. सध्या 95,000 फोटो, काही लाख ईमेल्स आणि इतर संवेदनशील माहिती समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते हा 300 GB चा डेटा आहे. तो खंगाळने आणि त्यातून माहिती बाहेर काढणे हे सोपं काम नाही. त्यासाठी शोध मोहीम राबवावी लागेल. हा डेटा उघडून पाहावा लागेल. विशेष म्हणजे हा डेटा सार्वजनिक असल्याने तो सर्वांसाठी खुला आहे. अमेरिकन न्याय विभागाच्या संकेतस्थळावर (US justice Department Website) ही माहिती अपलोड करण्यात येत आहे. त्यावर जगभरातील वाचकांच्या, शोधकर्त्यांच्या, हवशा, नवशा आणि गवशांच्या उड्या पडल्या आहेत. त्यांना Epstein Files मध्ये अजून काय मसाला, काय माल आहे, याचा शोध घ्यायचा आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाची साईट गळपाटली

तर अमेरिकेच्या न्याय विभागाच्या साईटवर अनेक शोधकर्ते टोपलं, फावडं, टिकास घेऊन खोदकामासाठी उतरले आहेत. जे जे मिळेल, ते ते हाती घेऊन त्याचा संदर्भ कुठे जुळतो, का जुळतो, कशाशी जुळतो याचा धांडोळा घेण्याची कोण शर्यत लागली आहे. मग व्हायचे ते झालेच. ही वेबसाईट कोलमडली. त्यावर क्षमतेपेक्षा अधिक ट्रॅफिक आले आहे. त्यामुळे अमेरिकेपासून ते पार आशियापर्यंत या साईटवर ट्रॅफिक जाम झाला आहे. साईट जे दाखवायचं ते काही दाखवायला तयार नाही. पण थोडी मेहनत घेतली आणि थोडं धैर्य ठेवलं तर फळ हाती येत असल्याचं काही शोधकर्त्यांचा अनुभव आहे. सध्या या साईटवर जगभरातून शोध मोहीम सुरू असल्याने साईट क्रॅश (US Department Website Crash) झाली आहे.

तर सध्या तुम्ही रांगेत आहात

तर या संकेतस्थळाकडे सध्या अनेक युझर्स धावले आहेत. यावर 95,000 फोटो, अनेक ईमेल्स, दस्तावेज यांचा समावेश आहे. DOJ’s Online Systems वर अनेकांनी एकाचवेळी माहिती घ्यायला सुरुवात केल्याने या साईटवर ताण आलेला आहे. जेफ्री एपस्टीन फाईल्स अमेरिकेच्या न्याय विभागाच्या साईटवर सहज उपलब्ध असल्याचे या विभागाने अगोदरच जाहीर केलेले आहे. युझर्स या संकेतस्थळावरून माहिती browse, search, and download करु शकतात.

इथं पाहा फाईल्स

या सर्व फाईल्स सार्वजनिकरित्या संशोधन आणि रिव्ह्युसाठी उपलब्ध आहेत. justice.gov या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे. त्यावर अबाऊट, आमचं काम, बातम्या, स्त्रोत, अनुदान, रोजगार याविषयीचे सहा भाग आहेत. सध्याच्या सर्व अपडेटची माहिती होमपेजवरी उपलब्ध आहे. ही साईट सध्या क्रॅश झाल्याने त्यावर माहिती शोधण्यासाठी वेळ लागू शकतो. तुम्ही सर्च या पर्यायामध्ये Epstein Files टाकल्यावर justice.gov only, All DOJ Sites, Videos, Search a DOJ site असं पर्याय येतात.

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.