ज्योतिषशास्त्रानुसार कर्ज घेण्यासाठी कोणता दिवस आहे शुभ आणि अशुभ, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही जर कर्ज घेत असाल तर कोणता दिवस शुभ आहेत आणि कोणत्या दिवशी कर्ज घेणे टाळावेत हे जाणून घेऊयात.

हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक दिवसाचे स्वतःचे विशेष महत्त्व असल्याचे वर्णन केले आहे. प्रत्येक दिवसाचा वेगळा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. प्रत्येक दिवस एका विशिष्ट देवता किंवा ग्रहाला समर्पित असतो. त्यातच दिवसाचा एक वेगळा शासक ग्रह असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात कर्ज घेण्यासाठी शुभ आणि अशुभ दिवस देखील सांगितलेले आहेत.
आपल्यापैकी अनेकांना त्याच्या संपूर्ण आयुष्यात पैशाचे महत्व अधिक असते. पैशाचा व्यवहार करताना प्रत्येकजण जपून आणि विचार करून करत असतो. माणसाला जीवनात मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज भासते. तसेच अनेकांना कर्जाची देवाणघेवाण करावी लागते, आणि कधी कधी हेच कर्ज फेडताना माणसाच्या नाकेनऊ येतात. तर ज्योतिषशास्त्रानुसार कर्ज घेण्यापूर्वीचे दिवस विचारात घेतले पाहिजेत. तर तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार कर्ज घेण्यासाठी कोणते दिवस शुभ आहेत आणि कोणते दिवस कर्ज घेणे टाळावे हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
कर्ज घेण्यासाठी कोणता दिवस शुभ आणि कोणता अशुभ?
ज्योतिषशास्त्रानुसार सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार हे पैसे उधार घेण्यासाठी शुभ दिवस मानले जातात. या दिवशी बँकांकडून कर्ज घेणे किंवा इतरांकडून पैसे उधार घेणे शुभ मानले जाते. या दिवशी घेतलेले कर्ज लवकर फेडता येते. तथापि काही दिवस पैसे उधार घेण्यासाठी अत्यंत अशुभ मानले जातात. मंगळवार, बुधवार आणि शनिवार हे पैसे उधार घेण्यासाठी अशुभ दिवस मानले जातात.
कर्ज फेडण्यासाठी हा दिवस शुभ
हे तीन दिवस कर्ज घेण्यासाठी अशुभ मानले जातात. त्यांच्या नकारात्मक परिणामामुळे व्यक्ती कर्ज फेडण्यास असमर्थ ठरू शकते. या दिवशी कर्ज घेणाऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो. मंगळवार आणि बुधवार हे कर्ज फेडण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानले जातात. बुधवार आणि गुरुवार हे कर्ज देण्यासाठी अत्यंत अशुभ मानले जातात. या दिवशी कर्ज दिल्यास आर्थिक संकट येऊ शकते. रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. असे म्हटले जाते की रविवारी पैसे उधार घेऊ नयेत. या दिवशी कर्ज घेतल्यास ते परतफेड करण्यास विलंब होऊ शकतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
