
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 57 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने भिडणार आहेत. केएल राहुल लखनऊचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्सकडे हैदराबादची सूत्र आहेत. हैदराबाद आणि लखनऊ दोघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांचा या हंगामातील 12 वा सामना आहे. पॉइंट्स टेबलमधील स्थानाचा अपवाद वगळता दोन्ही संघांची स्थिती आणि कामिगिरी सारखीच राहिली आहे. हैदराबाद आणि लखनऊ दोन्ही संघांनी 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत. हैदराबाद चौथ्या आणि लखनऊ सहाव्या स्थानी आहे.
हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना 8 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद येथे होणार आहे.
हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर मोफत पाहायला मिळेल.
सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), हेन्रिक क्लासेन (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, जयदेव उनाडकट , उमरान मलिक, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी आणि आकाश महाराज सिंग.
लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), अर्शिन कुलकर्णी, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ॲश्टन टर्नर, कृणाल पंड्या, युद्धवीर सिंग चरक, रवी बिश्नोई, नवीन उल हक, यश ठाकूर, मोहसीन खान, मणिमरन सिद्धार्थ , कृष्णप्पा गौथम, देवदत्त पडिक्कल, अमित मिश्रा, कायल मेयर्स, क्विंटन डी कॉक, मॅट हेन्री, प्रेरक मंकड, अर्शद खान आणि शामर जोसेफ.