RH vs RCB : आरसीबीचा आयपीएलमध्ये मोठा कीर्तीमान, अशी कामगिरी करणारी दुसरीच टीम

| Updated on: Apr 25, 2024 | 8:22 PM

IPL 2024 Royal Challengers Bengaluru : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सनरायजर्स हैदराबाद विरुद्धचा सामना हा ऐतिहासिक असा आहे. आरसीबी आयपीएल इतिहासात अशी कामगिरी करणारी दुसरी टीम ठरली आहे.

RH vs RCB : आरसीबीचा आयपीएलमध्ये मोठा कीर्तीमान, अशी कामगिरी करणारी दुसरीच टीम
rcb ipl 2024,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 41 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनराजयर्स हैदराबाद विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली. आरसीबीकडून कॅप्टन फाफ डु प्लेसीस आणि विराट कोहली ही सलामी जोडी मैदानात आली. आरसीबीच्या नावावर यासह मोठा विक्रम झाला आहे. आरसीबी आयपीएलच्या इतिहासात अशी कारमागिरी करणारी दुसरीच टीम ठरली आहे.

आयपीएलमध्ये आरसीबीचा कारनामा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा हा आयपीएलमधील 250 वा सामना ठरला आहे. आरसीबी आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारी दुसरीच टीम ठरली आहे. याआधी 250 सामने खेळण्याचा महारेकॉर्ड हा मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. आरसीबीने याआधी 249 सामने खेळले, मात्र त्यांना एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही. आरीसीबीने 3 वेळा फायनलमध्ये धडक मारली आहे. मात्र तिन्ही वेळा त्यांच्या पदरी अपयशच आलं. मात्र दुसऱ्या बाजूला मुंबईने तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे संघ

आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम मुंबईच्या नावावर आहे. मुंबईने ताज्या आकडेवारीनुसार एकूण 255 सामने खेळले आहेत. त्यानंतर आता आरसीबी 250 वा सामना खेळत आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने 247 सामने खेळले आहेत. शाहरुख खान याच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सने 244 सामने खेळले आहेत. तर पंजाब किंग्सचे 240 सामने झाले आहेत.

आरसीबीचा महारेकॉर्ड

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.