SRH vs MI : मुंबईच्या चिंधड्या उडवत हैदराबादने रचला इतिहास, जिंकण्यासाठी मोडावा लागणार रेकॉर्ड
Highest score in IPL history : आयपीएलमध्ये आजच्या दिवसाची इतिहासात नोंद केली जाणार आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्सविरूद्ध आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोर केला आहे.

आयपीएलमधील आठव्या सामन्यात इतिहास रचला गेला आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्सविरूद्ध 20 ओव्हरमध्ये 277-3 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासामधील सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड हैदराबादने आपल्या नावावर केला आहे. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांनी मुंबईच्या गोलंदाजांच्या धुराळा उडवला. तिघांनीही चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत हा महारेकॉर्ड रचला आहे. हैदराबादने 20 षटकांत 3 गडी गमावून 277 धावा केल्या. हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने नाबाद 80 धावा केल्या. 34 चेंडूंचा सामना करताना त्याने 7 षटकार आणि 4 चौकार लगावले. अभिषेक शर्माने 63 आणि ट्रॅव्हिस हेडने 62 धावा केल्या. मार्करामने नाबाद 42 धावा केल्या. मुंबईला जिंकण्यासाठी 278 धावांचं आव्हान असून लक्ष्य गाठण्यात यशस्वी होतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हैदराबाद संघाचा डाव
हार्दिक पंड्या याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ट्रॅव्हिस हेड आणि मयंक अग्रवाल मैदानात उतरले होते. मयंकने सावध सुरूवात केली होती, मात्र हेड वेगळ्याच फॉर्ममध्ये होता. गड्याने पहिल्या बॉलपासूनच मुंबईवर आक्रमण चढवलं होतं. हार्दिक पंड्या याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मिळालेल्या जीवदानाचा त्याने चांगला फायदा घेतला. कॅच सुटल्यानंतर त्याने सुरूवात केल्यावर तो काही थांबलाच नाही.
हैदराबाद संघाला पहिली झटका पंड्याने दिला खरा पण त्याची काही फायदा झाला नाही. मयंक आऊट झाल्यावर आलेल्या अभिषेक शर्मा यानेही हेडप्रमाणेच आक्रमण सुरू केलं. तीन ओव्हरमध्ये 40 धावा काढल्या आहेत. यामध्ये हेडने अवघ्या 10 बॉलमध्ये 31 धावा काढल्या होत्या. ट्रॅव्हिस हेडने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 18 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले होते.
ट्रॅव्हिस हेड मोठा फटका मारण्याच्या नादात कॅचआऊट झाला. हेडने 24 चेंडूंचा सामना करत 62 धावा केल्या. हेडच्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर डावाची सूत्रे आपल्या हातात घेत अभिषेकने हल्ला चढवला. चावलाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो आऊट झाला. हैदराबादकडून अभिषेक शर्माने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं, 23 चेंडूत 63 धावा केल्या आहेत. त्याने 3 चौकार आणि 7 षटकार मारले. त्यानंतर सनरायजर्स हैदराबाद संघाकडून क्लासेस याने 23 चेंडूत 50 धावा करत तिसरं अर्धशतक केलं. यामध्ये त्याने पाच षटकार आणि एक चौकार मारला. मार्कराम यानेही नाबाद 42 धावा केल्या. मुंबईकडून जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि , हार्दिक पांड्या यांना एक विकेट मिळाली. बुमराह सोडता सर्व गोलंदाजांना हैदराबाद रिमांडमध्ये घेतलं.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (WK), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (WK), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट
