जिओ सिनेमावर मोफत आयपीएल दाखवून मुकेश अंबानींना 4000 कोटींची कमाई

IPL 2024 Jio Cinema: मुकेश अंबानी यांच्याकडे फ्री ऑफर देऊन उद्योग हिट करण्याचा फार्मूला पूर्वीपासून आहे. जेव्हा रिलायन्सने जिओ लॉन्च केला तेव्हा फ्री डेटा, फ्री कॉलिंग आणि अनलिमिटेड ऑफर दिली. त्यानंतर दोन वर्षांत जिओने सर्व कंपन्यांना मागे टाकून टेलीकॉम सेक्टरमध्ये पहिला क्रमांक मिळवला.

जिओ सिनेमावर मोफत आयपीएल दाखवून मुकेश अंबानींना 4000 कोटींची कमाई
mukesh ambani
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 7:11 AM

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. त्यांची संपत्ती 116 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. पेट्रोकेमिकलपासून ते ग्रीन एनर्जीपर्यंत विविध उद्योगात ते आहेत. तसेच टेलीकॉम, मीडिया एंटरटेनमेंटमध्ये रिलायन्स कार्यरत आहे. मुकेश अंबानी यांनी बीसीसीआयकडून आयपीएलचे हक्क मिळवले. त्यानंतर जिओ सिनेमामार्फत आयपीएल मोफत दाखवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमी ‘खूश’ झाले. परंतु या निर्णयाचा फायदा मुकेश अंबानी यांनाही होत आहे.

तब्बल 23 हजार 758 कोटीत घेतले हक्क

मुकेश अंबानी यांनी वायकॉम18 च्या माध्यमातून पाच वर्षांसाठी आयपीएलचे डिजिटलचे हक्क मिळवले. तब्बल 23 हजार 758 कोटी रुपयांत हे हक्क त्यांनी घेतले आहे. म्हणजेच दरवर्षी त्यांना 4 हजार 750 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. परंतु इतकी रक्कम खर्च करुन ते आयपीएल मोफत दाखवत आहेत. मग मुकेश अंबानी यांचा काय प्लॅन आहे, मोफत सामने दाखवून ते कसे लाभ मिळवत आहेत. खरंतर मुकेश अंबानी शॉर्ट टर्म ऐवजी लॉग टर्म फायद्याचा विचार करतात, हे यामधून समोर आले आहे.

नुकसान नाहीच फायदाच

जिओ सिनेमावर फ्री मॅच दाखवून मुकेश अंबानी यांना नुकसान होत नाही. ते कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. आयपीएल मॅच दरम्यान फक्त फक्त जाहिरातीमधून चार हजार कोटींपेक्षा अधिक कमाई त्यांना होत आहे. त्यांनी दूरदृष्टी ठेऊन जाहिरातीचे दर कमी ठेवले आहे. यामुळे दीर्घकाळपर्यंत जाहिरातदार त्यांच्यासोबत असणार आहे. मागील वर्षी त्यांना फक्त जाहिरातमधून 3239 कोटी रुपयांची कमाई झाली होती. यावर्षी ती 4 हजार कोटी रुपयांवर जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

IPL मधून जिओ सिनेमेची कमाई कशी होते

आयपीएल मॅच दरम्यान ब्रँड स्पॉटलाइटचे ऑप्शन असते. त्यात कंपन्यांसाठी स्पेशल अटेंशन मिळते. रिपोर्टनुसार IPL कॅपेंनमध्ये 18 स्पॉन्सर आणि 250 जाहिरातदार आहेत. Dream11, पारले, बिट्रानिया आणि HDFC बँकसारखे ब्रॅण्ड आहेत. या ब्रँण्डच्या स्पॉटलाइट्समधून जिओ कमाई करतो. तसेच डेटाचा भरपूर वापर लोक करतात. त्यातूनही जिओची कमाई होते. जादा डेटामुळे जादा पैसे मोबाईलधारकाला खर्च करावे लागतात.

उद्योग हिट करण्याचा फार्मूला

मुकेश अंबानी यांच्याकडे फ्री ऑफर देऊन उद्योग हिट करण्याचा फार्मूला पूर्वीपासून आहे. जेव्हा रिलायन्सने जिओ लॉन्च केला तेव्हा फ्री डेटा, फ्री कॉलिंग आणि अनलिमिटेड ऑफर दिली. त्यानंतर दोन वर्षांत जिओने सर्व कंपन्यांना मागे टाकून टेलीकॉम सेक्टरमध्ये पहिला क्रमांक मिळवला. आता जिओ सिनेमेत अंबानी यांनी मास्टरस्ट्रोक खेळला आहे. कंपनी मोफत मॅच दाखवून कोट्यवधींची कमाई करत आहेत.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.