IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स औपचारिक सामना, पण लढाई प्रतिष्ठेची
आयपीएल 2025 स्पर्धेतील 62वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघाच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. मात्र शेवटच्या टप्प्यात दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेतील प्लेऑफचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. तीन संघांनी प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुर, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांनी प्लेऑफमधील स्थान पक्कं केलं आहे. तर चौथ्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चुरस आहे. तर उर्वरित चार संघांचा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. यात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांचा समावेश आहे. 20 मे रोजी हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पण ही दोन्ही संघात प्रतिष्ठा वाचवण्यासाठी लढाई होणार आहे. कारण जय पराजयापेक्षा आता अब्रू वाचवणं महत्त्वाचं आहे. आतापर्यंत दोन्ही संघ 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्सने 16, तर राजस्थान रॉयल्सने 14 वेळा बाजी मारली आहे. त्यामुळे या सामन्यात कोण भारी पडतं याची उत्सुकता आहे.
दोन्ही संघांची स्पर्धेतील आतापर्यंतची स्थिती
चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. राजस्थान रॉयल्सने 13 सामने खेळले असून चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शेवटचा सामना आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात फक्त 3 विजय मिळाले आहेत. तर 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. राजस्थान रॉयल्स 6 गुण आणि -0.701 नेट रनरेटसह नवव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्स स्पर्धेतील 13वा सामना खेळणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या 12 पैकी 3 सामन्यात विजय आणि 9 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. चेन्नई सुपर किंग्स 6 गुण आणइ -0.992 नेट रनरेटसह सर्वात शेवटी म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्स: महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), नूर अहमद, आयुष म्हात्रे, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, डेव्हॉन कॉनवे, उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेविस, खलील अहमद, मथिशा पाथिराना.
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रियान पराग, यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, क्विन म्फाका, तुषार देशपांडे, शुभम दुवाल, आकाश मध.