AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs LSG Confirmed Playing XI, IPL 2025 : नाणेफेकीचा कौल चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने, कर्णधार महेंद्रसिंह धोनीची गोलंदाजीला पसंती

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Confirmed Playing XI in Marathi: आयपीएल 2025 स्पर्धेतील 30 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ससाठी करो या मरोची लढाई आहे. कारण या सामन्यात पराभव झाला तर प्लेऑफचं गणित आणखी किचकट होणार आहे.

CSK vs LSG Confirmed Playing XI, IPL 2025 : नाणेफेकीचा कौल चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने, कर्णधार महेंद्रसिंह धोनीची गोलंदाजीला पसंती
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 14, 2025 | 7:08 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 30 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आले आहेत. लखनौच्या एकाना स्टेडियमवर हा सामना होणार आहे. आतापर्यंत या दोन्ही संघात पाच सामने झाले आहेत. यात लखनौ सुपर जायंट्सचं पारडं जड दिसत आहे. लखनौ सुपर जायंट्सने 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नई सुपर किंग्सला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही. लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये यापूर्वी हे दोन्ही संघ दोनदा भिडले आहेत. यात एक सामना लखनौने जिंकला, तर एक सामना निकालाविना सुटला आहे. आयपीएल 2025 स्पर्धेच्या 30 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने कौल लागला आणि महेंद्रसिंह धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने सांगितलं की, खूप खूप शुभेच्छा, आम्हाला चांगला पाठिंबा मिळाला. सर्व चाहत्यांचे आभार. आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे, इथे दव पडण्याची शक्यता आहे. विकेट चांगली होते. योग्य स्वभाव निश्चित करणे महत्वाचे आहे. आम्ही आमच्या फलंदाजीमध्ये सातत्य राखले नाही. चेंडूसह आमची बाजू मजबूत आहे. सकारात्मक मानसिकता असणे महत्वाचे आहे, मोठे शॉट्स खेळणे गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. आमच्याकडे काही बदल आहेत. अॅश आणि कॉनवेऐवजी ओव्हरटन आणि रशीद आले आहेत.

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने सांगितलं की, हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. आम्ही प्रथम गोलंदाजी केली असती. लखनौमध्ये पहिल्या डावात खेळण्याची गती कमी असते, हळूहळू ती सुधारते. आम्ही सीएसकेबद्दल फक्त एकच गोष्ट बोललो ती म्हणजे आम्हाला त्यांना सलामी द्यायची नाही, फक्त आमचे 100% योगदान द्यायचे आहे. आम्हाला तिथे जाऊन चांगले क्रिकेट खेळायचे आहे. फक्त एकच बदल केला आहे. हिम्मत सिंगऐवजी मार्श परतला आहे .

दोन्ही संघांची प्लेइंग 11

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, रवींद्र जडेजा, जेमी ओव्हरटन, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), अंशुल कंबोज, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी.

निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.