AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 CSK vs PBKS Live Streaming : चेन्नई विरुद्ध पंजाब दुसऱ्यांदा आमनेसामने, यलो आर्मी पराभवाची परतफेड करणार?

Chennai Super Kings vs Punjab Kings Live Streaming: आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांची एकमेकांसमोर येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे.

IPL 2025 CSK vs PBKS Live Streaming : चेन्नई विरुद्ध पंजाब दुसऱ्यांदा आमनेसामने, यलो आर्मी पराभवाची परतफेड करणार?
M S Dhoni Ravindra Jadeja PBKS vs CSK IPL 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 30, 2025 | 12:09 AM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. श्रेयस अय्यर पंजाबचं तर महेंद्रसिंह धोनी चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील 10 वा सामना असणार आहे. दोन्ही संघांची ही या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. याआधी दोन्ही संघ 8 एप्रिलला आमनेसामने आले होते. तेव्हा पंजाब किंग्सने चेन्नई टीमवर 18 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सकडे या सामन्यात विजय मिळवून गेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी असणार आहे. त्यामुळे चेन्नई पंजाबचा हिशोब बरोबर करणार का? याकडे यलो आर्मीचं लक्ष असणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना केव्हा?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना बुधवारी 31 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना कुठे?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना एमए चिदंबरम स्टेडियम,येथे आयोजित करण्यात आला आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स मॅच मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.

पंजाबचं मिशन प्लेऑफ

पंजाब किंग्सने या मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. पंजाबने या 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर 3 सामने गमावले आहेत.  तर एका सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे पंजाब 11 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्सला या हंगामात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे चेन्नईचं या मोसमातून पॅकअप झालं आहे. चेन्नईला 9 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. तर चेन्नईला 7 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. चेन्नई 4 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी दहाव्या स्थानी आहे.

चेन्नईचं प्लेऑफमधून पॅकअप झालं आहे. त्यामुळे चेन्नईचा आता जाता जाता काही सामने जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पंजाबसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे चेन्नई हा सामना जिंकून पंजाबच्या अडचणी वाढवू शकते. त्यामुळे पंजाबच्या दृष्टीने हा निर्णायक ठरणार आहे.

Follow Us
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे.
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,.
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर.
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत....
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप.
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....