MI vs LSG : जसप्रीत बुमराहबाबत कर्णधार हार्दिक पांड्याने दिली मोठी अपडेट, म्हणाला…

आयपीएल 2025 स्पर्धेतील 16व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संघातील बदल आणि जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत सांगितलं आहे.

MI vs LSG : जसप्रीत बुमराहबाबत कर्णधार हार्दिक पांड्याने दिली मोठी अपडेट, म्हणाला...
| Updated on: Apr 04, 2025 | 7:36 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील महत्त्वाचा सामना होत आहे. कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यापैकी 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘आपण प्रथम गोलंदाजी करणार आहोत. एक नवीन विकेट दिसतेय. सामन्यात कशी खेळेल हे मला माहित नाही. चांगली ट्रॅक दिसतेय. दव नंतर येऊ शकते. पाठलाग करणे चांगले वाटले. आम्हाला विकेटबद्दल बोलायचे नाही. आम्ही येथे चांगले क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत. आमच्यात हीच चर्चा झाली आहे. संघ म्हणून खेळपट्टीवर बोलू नका.योग्य योजनांवर टिकून राहणे आणि हुशार असणे. बरेच धावा केल्या जात आहेत. क्रिकेट परिस्थितीवर आधारित आहे.’

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला आराम देण्यात आला आहे. प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट प्लेयरमध्ये नसल्याने चर्चा रंगली आहे. असं असताना कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितलं की, सराव करताना रोहितच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे त्यामुळे या सामन्यात खेळणार नाही. दुसरीकडे हार्दिक पांड्याला जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबतही विचारलं तेव्हा तो म्हणाला की, जसप्रीत संघात लवकरच परतला पाहिजे. हार्दिक पांड्याच्या या पाच शब्दात बरंच काही दडलं आहे. जसप्रीत बुमराहची मुंबई संघाला किती गरज हे अधोरेखित होत आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, आकाश दीप, आवेश खान.

मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट सब्स: तिलक वर्मा, कॉर्बिन बॉश, रॉबिन मिन्झ, सत्यनारायण राजू, कर्ण शर्मा.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, दीपक चहर, अश्वनी कुमार, विघ्नेश पुथूर, ट्रेंट बोल्ट.

लखनौ सुपर जायंट्स इम्पॅक्ट सब्स: रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, शाहबाज अहमद, मणिमारन सिद्धार्थ, आकाश सिंग.