AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs LSG : सूर्यकुमारच्या आनंदावर काही तासांतच विरजण, मुंबईच्या स्टार बॅट्समनला मोठा झटका

Suryakumar Yadav Ipl 2025 : मुंबई इंडियन्सचा अनुभवी आणि स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव याने रविवारी लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. सूर्याने यासह पलटणच्या विजयात मोठी भूमिका बजावली. मात्र सूर्याला या सामन्याच्या काही तासांनंतर मोठा झटका लागला.

MI vs LSG : सूर्यकुमारच्या आनंदावर काही तासांतच विरजण, मुंबईच्या स्टार बॅट्समनला मोठा झटका
Suryakumar Yadav Sad Ipl Mumbai IndiansImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 28, 2025 | 6:58 PM
Share

आयपीएल 2025 मध्ये रविवारी 27 एप्रिलला डबल हेडरचा थरार रंगला आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात वानखेडे स्टेडिममध्ये मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सवर मात करत पराभवाची परतफेड केली आणि हिशोब बरोबर केला. तर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिट्ल्सचा धुव्वा उडवला. सूर्यकुमार यादव याने मुंबईला विजयी करण्यात निर्णायक भूमिका बजावली. सूर्याने लखनौ विरूद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात सूर्याने अर्धशतकी खेळी केली. सूर्याने यासह ऑरेंज कॅप पटकावली. सूर्याची ऑरेंज कॅप मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यामुळे सूर्या प्रचंड आनंदी होता. मात्र सूर्याच्या या आनंदावर काही तासांतच विरजण पडलं.

सूर्याने आयपीएल 2025 मधील 45 व्या सामन्यात लखनौ विरुद्ध 28 बॉलमध्ये 45 रन्स केल्या. सूर्यकुमार यादव याने यासह आयपीएलमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या. सूर्या वेगवान 4 हजार धावा करणारा पहिला भारतीय ठरला. सूर्याने यासह ऑरेंज कॅपही मिळवली. सूर्या इतक्या वर्षात पहिल्यांदा ऑरेंज कॅप मिळवण्यात यशस्वी ठरला. मात्र सूर्या 2-3 तासांपेक्षा फार वेळ ऑरेंज कॅप आपल्याकडे ठेवण्यात अपयशी ठरला. आरसीबीच्या विराट कोहली याने दिल्ली विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना अर्धशतकी खेळी केली. विराटच्या खेळीमुळे आरसीबीचा विजय सोपा झाला. विराटने या अर्धशतकासह सूर्याकडे असलेली मानाची ऑरेंज कॅप मिळवली.

सूर्याने लखनौ विरुद्ध केलेल्या खेळीमुळे त्याच्या नावावर या 18 व्या मोसमात एकूण 427 धावा झाल्या. सूर्या यासह ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. मात्र पुढच्याच दिल्ली विरुद्ध आरसीबी सामन्यानंतर ऑरेंज कॅपने डोकं बदललं. विराटने दिल्ली विरुद्ध 47 चेंडूत 51 धावांची खेळी केली. विराटच्या नावावर यासह 18 व्या मोसमात एकूण 447 धावा झाल्या. विराटच्या खात्यात सूर्याच्या तुलतने 16 धावा अधिक झाल्या. विराट अशापक्रारे ऑरेंज कॅप मिळवण्यात यशस्वी ठरला.

कुणाच्या खात्यात किती धावा?

  1. विराट कोहली, 10 सामने, 443 धावा.
  2. सूर्यकुमार यादव, 10 सामने, 427 धावा.
  3. साई सुदर्शन, 8 सामने, 417 धावा.
  4. निकोलस पूरन, 10 सामने, 404 धावा.
  5. मिचेल मार्श, 9 सामने 378 धावा.

टॉप 5 मध्ये कोण कोण?

दरम्यान ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली, सूर्यकुमार यादव या दोघांव्यतिरिक्त टॉप 5 मध्ये गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर चौथ्या आणि पाचव्या स्थानी लखनौ सुपर जायंट्सचे फलंदाज आहेत. निकोलस पूरन चौथ्या आणि मिचेल मार्श पाचव्या स्थानी आहे.

Follow Us
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?