PBKS vs DC : समीर रिझवीचं वादळी अर्धशतक, दिल्लीचा शेवट गोड, पंजाब किंग्सला मोठा झटका
Punjab Kings vs Delhi Capitals Match Result : दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएलच्या 18 व्या हंगामाचा शेवट गोड करण्यात यश मिळवलं आहे. दिल्लीने 6 विकेट्ने विजय मिळवत प्लेऑफसाठी क्वालिफाय केलेल्या पंजाब किंग्सला मोठा झटका दिला आहे.

समीर रिझवी याने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्लसने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील शेवट विजयाने केला आहे. दिल्लीने पंजाब किंग्सवर 6 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. पंजाबने दिल्लीला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीने हे आव्हान 3 बॉलआधी 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दिल्लीने 19.3 ओव्हरमध्ये 208 रन्स केल्या. दिल्लीचा हा सातवा विजय ठरला. तर या पराभवामुळे पंजाबच्या टॉप 2 मिशनला मोठा झटका लागला आहे. तसेच दिल्लीच्या या विजयामुळे टॉप 2 साठीची चुरस अजून वाढली आहे. त्यामुळे आता टॉप 2 साठी क्वालिफाय करण्याची आरसीबी आणि मुंबईलाही संधी आहे.
दिल्लीची विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली. केएल राहुल आणि कर्णधार फाफ डु प्लेसीस या सलामी जोडीने 55 धावांची भागीदारी केली.त्यानंतर केएल राहुल 21 बॉलमध्ये 35 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर दिल्लीने दुसरी विकेटही 10 धावांच्या अंतराने गमावली. फाफ 23 रन्स करुन आऊट झाला. त्यामुळे दिल्लीची 2 आऊट 65 अशी स्थिती झाली.
करुण नायरची निर्णायक खेळी
त्यानंतर करुण नायर आणि सेदीकुल्लाह अटल या जोडीने काही वेळ दिल्लीचा डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 28 रन्स जोडल्या. त्यानंतर सेदीकुल्लाह 22 धावावंर बाद झाला. दिल्लीने 10.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 93 रन्स केल्या. त्यामुळे आता दिल्लीला जिंकण्यासाठी एका मोठ्या आणि महत्त्वाच्या भागीदारी गरज होती. करुण नायर आणि समीर रिझवी या जोडीने ही भागीदारी करुन दाखवली आणि दिल्लीच्या विजयाचा पाया रचला.
करुण आणि समीर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 62 रन्सची निर्णायक भागीदारी केली. त्यानंतर करुण नायर आऊट झाला. करुणने 27 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. करुणचं हे योगदान निर्णयाक ठरलं. करुण आऊट झाल्यानंतर दिल्लीला विजयासाठी 30 बॉलमध्ये 52 रन्सची गरज होती. करुणनंतर ट्रिस्टन स्टब्स समीर रिझवची साथ देण्यासाठी मैदानात आला.
दिल्लीचा शेवट विजयाने
For his maiden #TATAIPL 5️⃣0️⃣ and finishing act, Sameer Rizvi receives the Player of the Match award 👏👏
Relive his innings ▶ https://t.co/rPYjSTb5J0 #PBKSvDC pic.twitter.com/YRnE5iyjFD
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2025
समीरने अखेरच्या षटकात चौफेर फटकेबाजी केली. तर दुसऱ्या बाजूने ट्रिस्टन स्टब्सने चांगली साथ दिली. समीर रिझवीने तोडफोड खेळी करत दिल्लीला विजयाजवळ आणलं. तर 20 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर सिक्स खेचून दिल्लीला विजय मिळवून दिला. समीरने 25 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने नॉट 58 रन्स केल्या. तर ट्रिस्टन स्टब्स याने 14 चेंडूत नाबाद 18 धावा केल्या. तसेच पंजाबकडून हरप्रीत ब्रार याने दोघांना बाद केलं. तर मार्को यान्सेन आणि प्रवीण दुबे या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.