IPL 2025 Final : आरसीबीचा फायनलमध्ये महारेकॉर्ड, विराट-फिल सॉल्टचा कारनामा

Royal Challengers Bengaluru IPL 2025 Final Record : रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुची आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचण्याची चौथी वेळ आहे. आरसीबीने या चौथ्या झटक्यात मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आरसीबी हा कारनामा करणारी पहिली टीम ठरली आहे.

IPL 2025 Final : आरसीबीचा फायनलमध्ये महारेकॉर्ड, विराट-फिल सॉल्टचा कारनामा
Phil Salt and Virat Kohli Ipl 2025 Final
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Jun 03, 2025 | 10:59 PM

आयपीएलच्या 18 व्या हंगामातील (IPL 2025) महाअंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स हे 2 संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकेलली नाही. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. आरसीबीने याआधी फायनलमध्ये 3 तर पंजाबने 1 वेळा प्रवेश मिळवला. मात्र दोन्ही संघांना ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यामुळे आता 18 वर्षांची प्रतिक्षा कोण संपवणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. हा महामुकाबला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. आरसीबीने या सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये महारेकॉर्ड केला आहे. आरसीबीने अशी कामगिरी करुन दाखवलीय जे 5-5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई आणि मुंबईलाही जमलेलं नाही.

विराट आणि फिलीप सॉल्टचा महारेकॉर्ड

पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीकडून विराट कोहली आणि फिल सॉल्ट सलामी जोजी मैदानात आली. पंजाबकडून अर्शदीप सिंह याने पहिली ओव्हर टाकली. अर्शदीपने टाकलेला पहिलाच बॉल वाईड टाकला. त्यांनतर फिल सॉल्टने 2 बॉलवर एकही रन घेतली नाही. मात्र तिसऱ्या बॉलवर सॉल्टने कडक सिक्स ठोकला. सॉल्टने चौथ्या बॉलवर 2 रन्स घेतल्या. तर पाचव्या बॉलव सॉल्टने फोर लगावला. तर सहाव्या बॉलवर आरसीबीला एकही धाव करता आली नाही. आरसीबीने अशाप्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये एकूण 13 रन्स केल्या.

आरसीबीने यासह आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीतील सामन्यातील पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम केला. याआधी हा विक्रम चेन्नईच्या नावावर होता. चेन्नईने 2023 मध्ये अंतिम फेरीत याच मैदानात गुजरात टायटन्स विरुद्ध पहिल्या षटकात 10 धावा केल्या होत्या.

आयपीएल फायनलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा

आरसीबी विरुद्ध पंजाब, 13-0, अहमदाबाद, 2025

सीएसके विरुद्ध जीटी, 10-0, अहमदाबाद, 23

केकेआर विरुद्ध पीबीकेएस, 10-1, बंगळुरु, 2014

पंजाबसमोर 191 धावांचं आव्हान

दरम्यान आरसीबीने पंजाबसमोर विजयासाठी 191 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 190 रन्स केल्या. आरसीबीसाठी अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने सर्वाधिक 43 रन्स केल्या. तर इतर फलंदाजांनीही चांगलं योगदान दिलं. तर पंजाबसाठी अर्शदीप सिंह आणि कायले जेमीन्सन या दोघांनी सर्वाधिक आणि प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.