AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Retention 2025 Live Streaming: कोण रिलीज कोण रिटेन? इथे लाईव्ह पाहता येणार

IPL 2025 Retention Date, Time: आयपीएल 2025 मेगा ऑक्शनआधी सर्व 10 संघ आपल्या रिटेन खेळाडूंची नावं जाहीर करणार आहे. त्यासाठीची आज 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे.

IPL Retention 2025 Live Streaming: कोण रिलीज कोण रिटेन? इथे लाईव्ह पाहता येणार
IPL 2025 Auction
| Updated on: Oct 31, 2024 | 3:22 PM
Share

आयपीएल 18 व्या मोसमासाठी (IPL 2025) यंदा मेगा ऑक्शन होणार आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे सध्या आयपीएल रिटेन्शनकडे लागून आहे. काही तासांमध्ये एकूण 10 फ्रँचायजी आपल्या संघात कुणाला कायम ठेवलंय आणि कुणाला करारमुक्त केलंय? याची यादी जाहीर करणार आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक फ्रँचायजी त्यांच्या गोटातील अनुभवी खेळाडूंना करारमुक्त अर्थात रिलीज करणार असल्याचं म्हटलं जात आहे. संघात कुणाला ठेवणार आणि कुणाला सोडणार? हे जाहीर करण्यासाठी 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्व 10 संघांना कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत द्यायची आहेत.

आयपीएल 18व्या मोसमासाठी कोणते खेळाडू ऑक्शनमध्ये उतरणार आणि कोण नाही? हे पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांना कायम ठेवलं जाईल ते संघांसोबत राहतील. तर ज्यांना करारमुक्त खेळाडू ऑक्शनमध्ये उतरतील. क्रिकेट चाहत्यांना कुणाला रिटेन केलंय आणि कुणाला रिलीज? हे लाईव्ह पाहता येणार आहे. नियमांनुसार प्रत्येक टीम संघात जास्तीत जास्त 6 खेळाडू कायम ठेवू शकते. फ्रँचायजी ऑक्शनआधी किंवा राईट टू मॅच कार्ड याद्वारे ऑक्शन दरम्यान खेळाडूला घेऊ शकते. या रिटेन्शनमध्ये जास्तीत जास्त 2 अनकॅप्ड खेळाडूच कायम ठेवू शकते. तर प्रत्येक टीम जास्तीत जास्त 5 कॅप्ड खेळाडूंना कायम ठेवू शकते.

आयपीएल 2025 रिटेन्शनबाबत सर्वकाही

आयपीएल 2025 रिटेन्शन लाईव्ह केव्हा?

आयपीएल 2025 रिटेन्शन लाईव्ह आज गुरुवारी 31 ऑक्टोबरला होणार आहे.

आयपीएल 2025 रिटेन्शन लाईव्ह कुठे पाहता येईल?

आयपीएल 2025 रिटेन्शन लाईव्ह टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

आयपीएल 2025 रिटेन्शन मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

आयपीएल 2025 रिटेन्शन मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.