AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs MI : राजस्थान विरुद्ध मुंबई सामन्याआधी टीमला झटका, मॅचविनर खेळाडू मुकणार!

Rajasthan Royals vs Mumbai Indians IPL 2025 : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मध्ये सलग 5 सामने जिंकले आहेत. मुंबई या मोसमातील 11 वा सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 1 मे रोजी होणार आहे.

RR vs MI : राजस्थान विरुद्ध मुंबई सामन्याआधी टीमला झटका, मॅचविनर खेळाडू मुकणार!
RR vs MI IPL 2025Image Credit source: IPL/BCCI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 29, 2025 | 8:46 PM
Share

वैभव सूर्यवंशी याच्या वादळी शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सोमवारी 28 एप्रिलला गुजरात टायटन्सवर मात केली. राजस्थानने यासह सलग 5 पराभवानंतर पहिला विजय मिळवला. राजस्थानने गुजरातवर घरच्या मैदानात अर्थात सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर येथे 8 विकेट्सने मात केली. वैभव सूर्यवंशी या 14 वर्षांच्या युवा फलंदाजाने केलेल्या 101 धावांच्या जोरावर राजस्थानने आयपीएल 2025 मधील एकूण तिसरा विजय मिळवला. त्यानतंर आता राजस्थान या हंगामातील आपला पुढील सामना हा 1 मे रोजी खेळणार आहे. मात्र त्याआधी राजस्थानसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे.

संजू सॅमसनची खेळण्याची शक्यता कमी

राजस्थान गुरुवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध भिडणार आहे. मात्र या सामन्यातही राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन याला खेळता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. संजूला गेल्या सलग 3 सामन्यांपासून दुखापतीमुळे खेळता आलं नाही. त्यामुळे संजूच्या अनुपस्थितीत युवा रियान पराग राजस्थानचं नेतृत्व करत आहे.

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात संजूला दुखापत

स्पोर्ट्स तकने दिलेल्या वृत्तानुसार, संजू मुंबई विरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे संजूला या सामन्याला मुकावं लागू शकतं. संजूची फिटनेस टेस्ट केली जाणार आहे. त्यानंतर संजूबाबत अंतिम निर्णय होणार आहे. संजू सॅमसन याला दिल्ली कॅपिट्ल्स विरूद्धच्या सामन्यात बॅटिंग करताना दुखापत झाली होती. तेव्हा संजूला रिटायर्ड हर्ट झाला होता. त्यानंतर संजूला सलग 3 सामन्यांत खेळता आलं नाही.

पहिल्या 3 सामन्यातही अनफीट

संजूला याआधी आयपीएल 2025 मधील राजस्थानच्या पहिल्या 3 सामन्यांमध्येही कॅप्टन म्हणून खेळता आलं नव्हतं. संजूला फिट नसल्यामुळे त्याला कॅप्टन्सी करता आली नाही. संजूला इंग्लंड विरूद्धच्या मालिकेत बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे संजू या पहिल्या 3 सामन्यांमध्ये बॅट्समन म्हणून खेळत होता. तेव्हाही रियान पराग यानेच राजस्थानचं नेतृत्व केलेलं.

दरम्यान राजस्थानला आयपीएल 2025 प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी फार कमी आहे. राजस्थानने उर्वरित सर्व सामने जिंकले तरच त्यांचं प्लेऑफमधील आव्हान कायम राहिल. राजस्थानने आतापर्यंत एकूण 10 सामने खेळले आहेत. राजस्थानला त्यापैकी फक्त 3 सामन्यातच विजयी होता आलं आहे.

Follow Us
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?