SRH vs PBKS : अभिषेक शर्माचं तडाखेदार शतक, हैदराबादकडून 246 धावांचा यशस्वी पाठलाग, पंजाबचा 8 विकेट्सने धुव्वा
Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Ipl 2025 Match Result : अभिषेक शर्मा याने केकेल्या विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हैदराबादने पंजाबवर एकतर्फी विजय मिळवला.

अभिषेक शर्मा (Abhishek Sharma Century) याने केलेल्या स्फोटक शतकी खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने घरच्या मैदानात पंजाब किंग्सवर (Punjab Kings) धमाकेदार विजय मिळवला आहे. हैदराबादने विक्रमी 246 धावांचा यशस्वी पाठलाग करत या मोसमातील सलग 4 पराभवानंतर पहिला आणि एकूण दुसरा विजय नोंदवला आहे. हैदराबादने हे आव्हान 18.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. हैदराबादने यासह पंजाबचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. अभिषेक व्यतिरिक्त ओपनर ट्रेव्हिस हेड यानेही या विजयात बॅटिंगने योगदान दिलं. हेडने 66 धावांची खेळी केली.
हेड-अभिषेकची विक्रमी सलामी भागीदारी
ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने विक्रमी भागीदारी करत हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. हेड-शर्माने 171 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर हेड आऊट झाला. हेडने 37 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 9 फोरसह 66 रन्स केल्या. त्यानंतर दुसऱ्या बाजूने अभिषेकने फटकेबाजी सुरुच ठेवली. अभिषेकने चौकार-षटकार ठोकत त्याच्या कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं.
अभिषेकने शतकानंतर गिअर बदलला आणि तोडफोड बॅटिंग केली. अभिषेकला नाबाद परतण्याची संधी होती. मात्र हैदराबाद विजयाच्या उंबरठ्यावर असताना अभिषेक आऊट झाला. अभिषेकने 55 चेंडूत 10 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने 141 धावांची विक्रमी खेळी केली. तर त्यानंतर हेन्रिक क्लासेन आणि ईशान किशन या जोडीने हैदराबादला विजयी केलं. क्लासेनने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 21 धावा केल्या. तर ईशान किशनने 6 बॉलमध्ये नॉट आऊट 9 रन्स केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि युझवेंद्र चहल या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
हैदराबादचा आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय
We said #PlayWithFire… and oh, they did. 🍿🔥#SRHvPBKS | #TATAIPL2025 pic.twitter.com/S9BMIC7CGl
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 12, 2025
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी आणि एशान मलिंगा.
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहल.
