AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला नमवलं, प्लेऑफसाठी MI vs RR सामन्याकडे नजर

आयपीएल 2026 स्पर्धेतील 68वा सामना पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला, हा सामना पंजाब किंग्सने जिंकला. सलग सहा पराभवानंतर पंजाब किंग्सला यश मिळालं आहे. पण प्लेऑफचं गणित अद्याप सुटलेलं नाही.

IPL 2026: पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला नमवलं, प्लेऑफसाठी MI vs RR सामन्याकडे नजर
IPL 2026: पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला नमवलं, प्लेऑफसाठी MI vs RR सामन्याकडे नजरImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 23, 2026 | 11:10 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 68व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभवाची धूळ चारली. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासठी 197 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना पंजाब किंग्सने दोन विकेट झटपट गमावल्या. त्यामुळे आव्हान गाठणं कठीण होईल असं वाटलं. पण कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांनी डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी खेळी केली आणि संघाला संकटातून बाहेर काढलं. त्याच्या खेळीमुळे पंजाब किंग्सचा विजय सोपा झाला. या विजयासह पंजाब किंग्सच्या प्लेऑफच्या आशा जिवंत आहेत. पंजाब किंग्सने सलग सहा पराभवानंतर विजयाची चव चाखली आहे. स्पर्धेच्या मध्यात टॉपला असलेल्या पंजाबची स्थिती नाजूक झाली होती. पण आता प्लेऑफसाठी जर तरच्या गणितावर अवलंबून राहावं लागणार आहे.  पंजाब किंग्सच्या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

पंजाब किंग्सला प्रियांश आर्याच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर कूपर कोन्नोली 18 धावांवर बाद झाला. अशा स्थितीत प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 76 चेंडूत 140 धावांची भागीदारी केली. प्रभसिमरन सिंग 39 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार मारत 69 धावांवर बाद झाला. अर्जुन तेंडुलकरने प्रभसिमरन सिंगला पायचीत केलं. त्यानंतर श्रेयस अय्यरने डाव पुढे नेला. श्रेयस अय्यरने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली आणि शतक ठोकलं. या शतकासह विजय कन्फर्म झाला. तीन गडी गमवून पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवला.

कसं आहे पंजाब किंग्सचं गणित

पंजाब किंगच्या खात्यात 2 गुण पडले असून 15 गुण झाले आहेत. तसेच चौथ्या स्थानी विराजमान झाले आहे. पण अजूनही प्लेऑफचं तिकीट मिळालेलं नाही. कारण मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात प्लेऑफचं चित्र स्पष्ट होणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली तर गाशा गुंडाळावा लागेल. पण पराभूत झाला तर मात्र पंजाब किंग्सला संधी आहे. दुसरीकडे, केकेआर दिल्ली कॅपिटल्स सामन्यातही केकेआरने सामना जिंकला आणि नेट रनरेटचं गणित सुटलं नाही तर पंजाब किंग्सचं प्लेऑफचं तिकीट पक्कं होईल. केकेआर पराभूत झाला तर मग राजस्थान रॉयल्सला प्लेऑफमध्ये खेळेल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...