AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Auction : मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये फक्त 2.75 कोटी, या खेळाडूंवर लावणार बोली!

आयपीएल 2026 स्पर्धेच्या मिनी लिलावाची तारीख आता जवळ येत चालली आहे. त्यामुळे फ्रेंचायझींनी आपल्याला हव्या खेळाडूसाठी फिल्डिंग लावली आहे. कोणत्या खेळाडूवर बोली लावायची वगैरे ठरवलं आहे.

IPL 2026 Auction : मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये फक्त 2.75 कोटी, या खेळाडूंवर लावणार बोली!
IPL 2026 Auction : मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये फक्त 2.75 कोटी, या खेळाडूंवर लावणार बोली!Image Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: Dec 12, 2025 | 5:45 PM
Share

आयपीएल स्पर्धेत सर्वात तगडा संघ म्हणून मुंबई इंडियन्सची ओळख आहे. एकापेक्षा एक सरस खेळाडू मुंबई संघात आहेत. पण मागच्या पाच वर्षात मुंबई इंडियन्सच्या पदरात काही खास पडलं नाही. आयपीएल 2020 स्पर्धेत शेवटचं जेतेपद मिळवलं होतं. त्याने पाच वर्षात काहीच खास करता आलं नाही. त्यामुळे आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने कंबर कसली आहे. मुंबई इंडियन्सचं नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे आहे. तर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा या सारखे दिग्गज खेळाडू संघात आहेत. त्यामुळे प्लेइंग 11 साठी कुठेच काहीच उणीव नाही. असं असूनही मुंबई इंडियन्स मिनी लिलावात काही खेळाडूंसाठी फिल्डिंग लावणार आहे. पण पर्समध्ये फार काही शिल्लक नाही. 2.75 कोटींची रक्कम शिल्लक असून यातच 5 खेळाडू घ्यायचे आहेत. यात एका विदेशी खेळाडूचा समावेश करू शकतात. पण स्वस्तात मस्त मिळणं वाटतं तितकं सोपं नाही.

मुंबई इंडियन्सने ट्रेड विंडोच्या माध्यमातून काही खेळाडूंची देवाणघेवाण केली आहे. अर्जुन तेंडुलकरला ट्रेडच्या माध्यमातून लखनौ सुपर जायंट्सला दिलं आहे. इतकंच काय तर लखनौकडून शार्दुल ठाकुरला आपल्या संघात घेतलं आहे. बेव्हॉन जेकब्स, कर्ण शर्मा, लिझार्ड विल्यम्स, मुजीब उर रहमान, रीस टोपली, कृष्णन श्रीजीथ, सत्यनारायण राजू आणि विघ्नेश पुथूर यांनी रिलीज केलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडे फलंदाज आणि वेगवान गोलंदाजीचा ताफा आहे. पण फिरकीवर डाव लावावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज जॉर्ज लिंडे आणि न्यूझीलंडचा मिचेल सँटनर यांचा विचार केला जाऊ शकतो.

जॉर्ज लिंडे एमआय न्यूयॉर्क आणि एमआय केपटाऊनकडू खेळतो. त्याला बेस प्राईसवर मुंबई इंडियन्स घेऊ शकते. त्याची बेस प्राईस ही 1 कोटी आहे. त्यानंतर दुसरा पर्यात हा मायकल ब्रेसवेलचा आहे. पण त्याची बेस प्राईस ही2 कोटी आहे. त्यामुळे त्याला घेणं कठीण जाईल. शम्स मुलानी हा देखील पर्याय आहे. त्याची बेस प्राईस 30 लाख रूपये आहे.

मुंबई इंडियन्सचा लिलावापूर्वीचा संघ: हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, मिचेल सँटनर, नमन धीर, रघू शर्मा, राज बावा, रॉबिन मिंग, रायन रिकेल्टन, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, शार्दुल ठाकूर, शेरफान मार्कफोर्ड, शेरफान मार्कन रॉबिन, आशियान रॉबिन, रघुन शर्मा कुमार, कॉर्बिन बॉश, दीपक चहर.

अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी.
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार.
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर.
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार.
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला.
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतलं अजित पवारांचं शेवटचं दर्शन
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतलं अजित पवारांचं शेवटचं दर्शन.
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी.
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी.