AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : अक्षर पटेल याची बीसीसीआयच्या नियमाविरोधात जाहीर नाराजी, स्पष्टच म्हणाला, व्हीडिओ व्हायरल

Axar Patel On Impact Player : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी याआधी बीसीसीआयच्या नियमावरुन भाष्य केलं होतं. त्यानंतर आता अक्षर पटेल यानेही बीसीसीआयचा नियम आपल्याला वैयक्तिकरित्या पटत नसल्याचं म्हटलंय.

IPL 2026 : अक्षर पटेल याची बीसीसीआयच्या नियमाविरोधात जाहीर नाराजी, स्पष्टच म्हणाला, व्हीडिओ व्हायरल
Dc Captain Axar Patel Ipl 2026Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 23, 2026 | 7:46 PM
Share

आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी एकूण 10 संघांनी कंबर कसली आहे. या 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदाही ऑलराउंडर अक्षर पटेल हाच दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व करणार आहे. दिल्लीने गेल्या 18 व्या हंगामात अप्रतिम सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर निराशाजनक कामगिरीमुळे दिल्लीचा प्लेऑफच्या शर्यतीतून पत्ता कट झाला होता. त्यामुळे यंदा दिल्लीची गेल्या मोसमातील चूक सुधारून जबरदस्त कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याआधी कर्णधार अक्षरने बीसीसीआयच्या एका नियमाविरुद्ध प्रश्न उपस्थित करत जाहीर नाराजी व्यक्त केली. अक्षरने इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. अक्षरने त्याला इम्पॅक्ट प्लेअर नियम पटत नसल्याचं म्हटलं.

ऑलराउंडर अक्षर पटेल काय म्हणाला?

आयपीएल स्पर्धेत गेल्या 2 मोसमांपासून इम्पॅक्ट प्लेअर नियमाची अंमलबजावणी केली जात आहे. यंदाही हा नियम असणार आहे. इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे संघांना सामन्यादरम्यान परिस्थितीनुसार कोणत्या खेळाडूला कधी पाठवायचं याचं स्वतंत्र मिळालं. मात्र या नियमामुळे ऑलराउंडर खेळाडूंचं महत्त्व कमी झालं. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गेल्या 2 मोसमात फलंदाज आणि गोलंदाजांनाच सर्वाधिक संधी मिळाली आहे. त्यामुळे ऑलराउंडरचं महत्त्व कमी झालंय. अक्षरने नेमका याच मुद्द्याला हात घालत पत्रकार परिषदेत इम्पॅक्ट प्लेअर नियमावरुन भाष्य केलं.

इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत खेळाडूंमध्ये मतमतांतरे आहेत. अक्षर पटेल यानेही आपलं मत ठेवलं. अक्षरने ऑलराउंडर म्हणून या नियमाबाबत नाराजी व्यक्त केली. “मला हा नियम पटत नाही कारण मी स्वत: ऑलराउंडर आहे. आधी ऑलराउंडरला प्राधान्य दिलं जायचं. मात्र या नियमामुळे टीम मॅनेजमेंटकडून फलंदाज किंवा गोलंदाजाची निवड केली जात आहे”, असं अक्षरने म्हटलं.

“मी पण ऑलराउंडर…”

“मी पण ऑलराउडंर आहे. याच कारणामुळे मला हा नियम पटत नाही. मात्र खेळाडू म्हणून नियम मान्य करावा लागणार. मात्र मला वैयक्तिरित्या हा नियम मला पटलेला नाही”, असं अक्षरने म्हटलं.

दरम्यान ‘इमपॅक्ट प्लेअर’ या नियमाची 2024 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून या इमपॅक्ट प्लेअर नियमाला विरोध दर्शवण्यात येत आहे. या नियमाला रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज अनुभवी फलंदाजांनाही विरोध दर्शवला आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?