
IPL 2026 : टी-20 विश्वचषक स्पर्धा संपताच भारतात आयपीएल या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळेच या स्पर्धेच्या आयोजनाची तयारी केली जात आहे. सर्वच संघ खेळाडूंसाठी सराव, इतर सोई-सुविधा तसेच सपोर्टिंग स्टाफचे नियोजन करत आहे. यावेळी आपण कसे जिंकू शकतो, त्यासाठी प्रत्येक संघ स्ट्रॅटेजी आखत आहे.
असे असतानाच लखनऊ सुपर जायंट्स या संघासाठी खूप चांगली बातमी मिळाली आहे. लखनऊ सुपर जायंट्स या संघाने आपल्या संघाचा लोगो जारी केला आहे. लखनऊ संघाचा हा लोगो खूपच विशेष आहे. त्यामुळे यावेळी हा संघ ट्रॉफी जिंकणारच, असा विश्वास या संघाच्या चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. लखनऊ सुपर जायंट्स या संघाने आपल्या संघाचा नवा लोगो खूपच विशेष पद्धतीने तयार केला आहे. या लोगोमध्ये भवनान श्री गणेश आहेत. तीन शक्तिशाली प्रतिकांचा वापर करून लखनऊ या संघाने उत्तर प्रदेश या राज्याच्या संस्कृतीचा परिचय करून देण्याचा प्रयत्न या लोगोच्या माध्यमातून केला आहे.
लखनऊ संघाच्या नव्या लोगोमध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला पंख आहेत. हे गरुडाचे पंख आहेत. त्यानंतर या लोगोंमध्ये मुकूट आहे. हा मुकूट राजेशाही आणि शक्तीचे प्रतिक आहे. लोगोच्या मध्ये हत्ती आहे. म्हणजेच लखनऊच्या संघात साक्षात भगवान श्री गणेश आहेत. लखनऊ सुपर जायंट्स हा संघ 2022 साली आयपीएलमध्ये आला. त्यावेळी या संघाचे कर्णधारपद के एल राहुलकडे होते. हा संघा पहिल्याच वर्षी प्लेऑफपर्यंत पोहोचला होता.
Junoon hai, Toofan hai. Lucknow Super Giants ki ye ek nayi udaan hai 💙❤️ pic.twitter.com/xaLnnnZcwr
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) February 24, 2026
लखनऊ सुपर जायंट्स हा संघ 2024 सालीदेखील चांगली कामगिरी करू शकला नव्हता. हा संघ पॉइंट्स टेबलवर सातव्या स्थानी होता. 2025 साली या संघाचे कर्णधारपद ऋषभ पंतकडे देण्यात आले होते. हा सघं 2025 सालीदेखील सातव्या स्थानी होता. आता यावेळी ट्रॉफ जिंकण्यासाठी या संघाने पूर्ण ताकद लावली आहे. संघाचा लोगोही बदलला आहे. सोबतच यावेळी संघाकडे चांगले खेळाडू आहे. त्यामुळे यावळी हा संघ काय कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.