MI vs CSK : मुंबईने लाज घालवली, पलटणचा सर्वात मोठा पराभव, चेन्नईकडून 103 धावांनी धुव्वा

Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Result, IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र यलो आर्मीने पलटणचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला.

MI vs CSK : मुंबईने लाज घालवली, पलटणचा सर्वात मोठा पराभव, चेन्नईकडून 103 धावांनी धुव्वा
CSK vs MI Match Result IPL 2026
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 23, 2026 | 11:37 PM

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात इतिहास घडवला आहे. चेन्नईने होम टीम मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवला आहे. संजू सॅमसन याने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने मुंबईसमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईला या विजयी धावांचा पाठलाग करताना पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. चेन्नईने मुंबईला 19 ओव्हरमध्ये 104 रन्सवर गुंडाळलं. चेन्नईे अशाप्रकारे 103 धावांच्या फरकाने सामना नावावर केला. तर मुंबईचा धावांबाबत हा सर्वात मोठा पराभव ठरला. मुंबईचा हा या मोसमातील एकूण पाचवा तर वानखेडे स्टेडियममधील सलग आणि एकूण तिसरा पराभव ठरला.

Follow Us