AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs CSK :आईच्या निधनानंतर मैदानात उतरला, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट, कोण आहे मुकेश चौधरी?

Mukesh Chaudhary Mother Death : चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी त्याच्या आईच्या निधनाच्या 48 तासानंतर मैदानात उतरला. मुकेशने त्यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवली. मुकेशने क्विंटन डी कॉक याला आऊट केलं.

MI vs CSK :आईच्या निधनानंतर मैदानात उतरला, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट, कोण आहे मुकेश चौधरी?
Mukesh Chaudhary Mother DeathImage Credit source: Social Media
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 23, 2026 | 10:24 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 33 व्या सामन्यात प्रत्येकी 5-5 वेळा ट्रॉफी जिंकणारे 2 संघ एकमेकांविरुद्ध 2 गुणांसाठी भिडत आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये मुकेश चौधरी याचं नाव पाहून क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. आता तुम्ही म्हणाल प्लेइंग ईलेव्हनमध्ये नाव असण्यात असं विशेष काय? मात्र त्यामागे मोठं कारण आहे. मुकेश चौधरी त्याच्या आईच्या निधनानंतरही मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरला आहे. इतकंच नाही तर मुकेशने पहिल्यचा ओव्हरमध्ये विकेटही मिळवली.

मुकेशवर 48 तासांआधी दु:खाचा डोंगर कोसळला. मुकेशच्या आईचं मंगळवारी 21 एप्रिल रोजी निधन झालं. मुकेश आईच्या निधनानंतर घरी परतला. मुकेशने आईवर अंत्यसंस्कार केले. मुकेशने सर्व सोपस्कार पार पाडले. मुकेशने या अशा कठीण प्रसंगातही चेन्नई टीमसह काही तासात जोडला गेला. मुकेशच्या या धैर्याला सोशल मीडियावरुन सलाम केला जात आहे.

मुकेशच्या आईच्या निधनानंतर चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायजीकडून शोक व्यक्त करण्यात आला. सीएसकेने एक्स पोस्ट करत संवेदना व्यक्त केल्या. “सीएसकेचं कुटुंबिय म्हणून मुकेश चौधरी यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे आम्ही शोक व्यक्त करतो. आम्ही या अशा कठीण काळात मुकेश आणि त्याच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे आहोत”, असं एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुकेशकडून पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट

चेन्नई सुपर किंग्सने मुंबईसमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 207 धावा केल्या. चेन्नईसाठी ओपनर संजू सॅमसन याने सर्वाधिक धावा केल्या. संजूने नाबाद 101 धावा केल्या. तर विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला अकील हौसेन याने पहिला झटका दिला. अकीलने दानिश मालेवार याला झिरोवर आऊट केलं. त्यानंतर मुकेशने त्याच्या कोट्यातील पहिल्या आणि मुंबईच्या डावातील दुसऱ्या ओव्हरमध्येच मोठी विकेट मिळवली.

लाईव्ह स्कोअरकार्ड

मुकेशने या ओव्हरमधील पहिले 4 डॉट बॉल टाकले. त्यानंतर मुकेशने पाचव्या बॉलवर क्विंटन डी कॉक याला बोल्ड करत या सामन्यातील आपली पहिली विकेट मिळवली. मुकेशने विकेट मिळवताच आभाळाकडे पाहिलं. मुकेशचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे मुकेश या सामन्यात आणखी किती विकेट मिळवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुकेशकडून पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट, क्विंटन डी कॉक आऊट

चेन्नईच्या खेळाडूंकडून श्रद्धांजली

चेन्नईच्या खेळाडूंनी मुकेश आईला श्रद्धांजली वाहिली. मुकेशच्या आईचे निधन झाल्याने चेन्नईचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल