AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs PBKS : मुंबईसमोर वानखेडेत पंजाबचं आव्हान, पलटणच्या Playing 11 मध्ये बदल फिक्स! कुणाला डच्चू?

Mumbai Indians Probable Playing 11 Against Punjab Kings : मुंबईसमोर वानखेडे स्टेडियममध्ये पंजाब किंग्सचं आव्हान असणार आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने आरसीबी विरूद्धच्या पराभवानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करावे लागणार असल्याचे संकेत दिले होते.

MI vs PBKS : मुंबईसमोर वानखेडेत पंजाबचं आव्हान, पलटणच्या Playing 11 मध्ये बदल फिक्स! कुणाला डच्चू?
Shreyas Iyer and Rohit Sharma MI vs PBKSImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 16, 2026 | 4:23 AM
Share

मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन विजयी सलामी दिली. मात्र त्यानंतर मुंबईला सलग 3 पराभवांचा सामना करावा लागला. तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे आता पंजाब विरूद्धच्या सामन्यातून कॅप्टन हार्दिक पंड्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार असल्याचं स्पष्ट आहे. अशात पंजाब विरूद्धच्या सामन्यासाठी पलटणची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तिलक वर्माला डच्चू?

तिलक वर्मा मुंबईचा प्रमुख फलंदाज आहे. तिलक प्रामुख्याने तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी खेळतो. मात्र तिलकला या मोसमात आतापर्यंत काही खास करता आलेलं नाही. तिलकने आतापर्यंतच्या 4 सामन्यांत अनु्क्रमे 20, 0,14 आणि 1 अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे कॅप्टन हार्दिक तिलकला डच्चू देणार की विश्वास दाखवत प्लेइंग ईलेव्हनमध्ये कायम राखणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पंजाब-मुंबईत टफ फाईट

पंजाब आणि मुंबईत यांच्यात गुरुवारी 16 एप्रिलला होणारा 35 वा सामना असणार आहे. याआधी उभयसंघातील 34 सामन्यांचा निकाल पाहिल्यास दोन्ही संघ तुल्यबळ आहेत असंच म्हणावं लागेल. दोन्ही संघांनी प्रत्येकी 17-17 सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुरुवारी कोणता संघ विजय मिळवून आघाडी घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बुमराह खातं उघडणार का?

जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. मात्र दुर्देव असं की बुमराहची या मोसमातील 4 सामन्यानंतरही पहिल्या विकेटची प्रतिक्षा कायम आहे. मात्र बुमराहला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर करणं धाडसाचं ठरेल. त्यामुळे बुमराह पंजाब विरुद्ध कशी कामगिरी करतो हे  बॉलिंगदरम्यानच स्पष्ट होईल.

तसेच मुंबईचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा याला आरसीबी विरूद्धच्या दुखापतीमुळे पंजाब विरुद्ध खेळता येणार नसल्याचं म्हटलं जातंय. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात नाही. त्यामुळे आता कॅप्टन हार्दिक बदलाच्या संकेतानंतर काय निर्णय घेतो याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.

मुंबई-पंजाबची वानखेडेतील आकडेवारी

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आतापर्यंत वानखेडे स्टेडियमध्ये एकूण 10 सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांनी वानखेडे स्टेडियममध्ये प्रत्येकी 5-5 सामने जिंकले आहेत.

पंजाब विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे आणि जसप्रीत बुमराह.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या