RCB vs MI : सॉल्ट-रजतची विराट खेळी, टीमचा फिनिशिंग टच, पलटणसमोर 241 रन्सचं टार्गेट, मुंबई हिशोब करणार?

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru : मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळरु विरुद्ध जिंकायचं असले तर 12.5 च्या स्ट्राईक रेटने धावा कराव्या लागतील.

RCB vs MI : सॉल्ट-रजतची विराट खेळी, टीमचा फिनिशिंग टच, पलटणसमोर 241 रन्सचं टार्गेट, मुंबई हिशोब करणार?
Rajat Patidar and Virat Kohli RCB vs MI
| Updated on: Apr 12, 2026 | 11:18 PM

विराट कोहली, फिलिप सॉल्ट आणि कॅप्टन रजत पाटीदार या तिघांचा अर्धशतकी तडाखा आणि टीम डेव्हीड याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 20 व्या सामन्यात यजमान मुंबई इंडियन्ससमोर 241 धावांचं महाकाय आव्हान ठेवलं आहे. मुंबईने आतापर्यंत स्पर्धेच्या इतिहासात 221 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. त्यामुळे मुंबईला वानखेडे स्टेडियमध्ये जिंकायचं असेल तर आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करावा लागेल. आता या प्रयत्नात मुंबई इंडियन्स यशस्वी ठरणार की आरसीबी मैदान मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आरसीबीच्या सलामी जोडीची शतकी भागीदारी

मुंबईने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली या सलामी जोडीने संधीचा फायदा घेतला. फिलिप आणि विराटने मैदानात चौफेर फटकेबाजी करुन मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी शतकी भागीदारी करुन आरसीबीला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली. विराट आणि फिलीपने 120 रन्सची पार्टनरशीप केली. लोकल बॉय शार्दूल ठाकुर याने ही सेट जोडी फोडून आरसीबीला पहिला झटका दिला.

शार्दूलने फिलीपला कॅप्टन हार्दिक पंड्या याच्या हाती कॅच आऊट केलं. फिलीपने 36 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 6 फोरसह सर्वाधिक 78 रन्स केल्या. फिलीप आऊट झाल्याने आरसीबीच्या धावांवर काही प्रमाणात कमी होईल, अशी आशा पलटणच्या चाहत्यांना होती. मात्र तिसऱ्या स्थानी आलेल्या रजतने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दरम्यान मुंबईने आरसीबीला दुसरा झटका दिला. हार्दिक पंड्या याने विराटला 50 रन्सवर सूर्यकुमार यादव याच्या हाती कॅच आऊट केलं.

रजतचा तडाखा

विराट आऊट झाल्यानंतरही रजतने तडाखा कायम ठेवला. रजतने 265 च्या स्ट्राईक रेटने धुव्वादार बॅटिंग केली. रजतने फक्त 9 बॉलमध्ये 46 रन्स केल्या. रजतने 20 बॉलमध्ये 53 रन्स केल्या. रजतच्या या स्फोटक खेळीला मिचेल सँटनर याने ब्रेक लावला. रजतने 20 बॉलमध्ये 53 रन्स केल्या. जितेश शर्मा याला ट्रेंट बोल्ट याने स्वस्तात आऊट केलं. जितेशने 10 धावा केल्या. तर रोमरियो शेफर्ड आणि टीम डेव्हिड ही जोडी नॉट आऊट परतली. रोमरियोने नॉट आऊट 2 रन्स केल्या. तर टीम डेव्हिड याने 212.50 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. टीमने 16 बॉलमध्ये नॉट आऊट 34 रन्स केल्या. टीमने या दरम्यान 3 सिक्स आणि 2 फोर लगावले.

मुंबईचे गोलंदाज अपयशी

आरसीबीच्या फलंदाजांसमोर मुंबईचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. मुंबईकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. मयंक मार्कंडे आणि जसप्रीत बुमराह विकेट मिळवण्यात अपयशी ठरले. तर ट्रेंट बोल्ट, हार्दिक पंड्या, मिचेल सँटनर आणि शार्दूल ठाकुर या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us