MS Dhoni Retirement : धोनी IPL 2026 नंतर निवृत्त होणार; सीएसकेच्या माजी खेळाडूकडून शिक्कामोर्तब! म्हणाला..

MS Dhoni IPL Retirement : महेंद्रसिंह धोनी याच्या आयपीएल निवृत्तीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र आता धोनी आयपीएलमधून कधी निवृत्त होणार? याबाबत सीएसकेच्या माजी खेळाडूने प्रतिक्रिया दिली आहे.

MS Dhoni Retirement : धोनी IPL 2026 नंतर निवृत्त होणार; सीएसकेच्या माजी खेळाडूकडून शिक्कामोर्तब! म्हणाला..
CSK MS Dhoni IPL
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 17, 2025 | 10:22 PM

आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमासाठी (IPL 2026) मंगळवारी 16 डिसेंबरला अबुधाबीत मिनी ऑक्शनचा थरार (Mini Auction) रंगला. या मिनी ऑक्शनमधून 369 पैकी 10 फ्रँचायजींनी 77 खेळाडू्ंची निवड केली. कॅमरुन ग्रीन हा या मिनी ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना तगडा भाव मिळाला. चेन्नई सुपर किंग्सने या दोन्ही खेळाडूंसाठी प्रत्येकी 14 कोटी 20 लाख रुपये मोजले. तसेच इतक खेळाडूही मालमाल झाले. या दोघांची बेस प्राईज ही 30 लाख रुपये इतकी होती. मात्र सीएसकेने या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर मोठी बोली लावली. या अनकॅप्ड खेळाडूंना आता सीएसकेसारख्या सर्वात यशस्वी संघांसोबत खेळण्याची संधी मिळाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईचा अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

क्रिकेट वर्तुळात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रत्येक हंगामाच्या काही महिन्यांआधी धोनीच्या निवृत्तीची चर्चा केली जाते. मात्र आता सीएसकेच्या माजी खेळाडूनेच धोनीच्या निवृत्तीबाबत अपडेट दिली आहे. धोनी आयपीएल 2026 नंतर निवृत्त होणार असल्याची माहिती सीएसकेचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा याने दिली आहे. धोनी आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून खेळतोय. धोनी त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील 2016 आणि 2017 या 2 वर्षांचा अपवाद वगळता तो चेन्नईसाठी खेळतोय. धोनीने 2016 आणि 2017 या 2 वर्षांत पुण्याचं प्रतिनिधित्व केलं होतं. तर धोनीने त्याच्याच नेतृत्वात चेन्नईला तब्बल 5 वेळा आयपीएल चॅम्पियन केलं आहे.

धोनीच्या निवृत्तीबाबत उथप्पा काय म्हणाला?

अनेक माजी खेळाडू ऑक्शनसाठी 16 डिसेंबरला  कव्हरेज करत होते. आकाश चोप्रा, इरफान पठाण, रॉबिन उथप्पा आणि इतर माजी खेळाडू हे जिओहॉटस्टारवर ऑक्शनबाबत विश्लेषण करत होते. उथप्पाने या दरम्यान धोनीच्या निवृत्तीबाबत भाष्य केलं.

“धोनी आगामी हंगामात खेळून निवृत्ती घेईल”

इनसाईडस्पोर्टनुसार, रॉबिन उथप्पा ऑक्शनदरम्यान म्हणाला, “मला वाटतं की सर्व चित्र स्पष्ट आहे. धोनीचा हा शेवटचा हंगाम असणार हे स्पष्ट आहे. आता धोनी पुढील हंगामात खेळेल याबाबत आता कोणताही अंदाज किंवा चर्चा नाही. धोनी आगामी हंगामात खेळून निवृत्ती घेईल”, असं उथप्पा म्हणाला.

कायम अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देणाऱ्या सीएसकेने यंदा ऑक्शनमध्ये युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. सीएसके फ्रँचायजीच्या या भूमिकेवरुन उथप्पाने भाष्य केलं. उथप्पानुसार, हे असं सर्व एकाएकी झालेलं नाही. याबाबत आधीपासून सुरुवात झाली आहे.

“युवा खेळाडूंमध्ये केलेली गुंतवणूक आणि गेल्या वर्षी ज्या पद्धतीने संघाची बांधणी केलीय. हे सर्व पाहता फ्रँचायजीचा कळ हा नवे खेळाडू घडवणं आणि प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याकडे आहे”, असं उथप्पाने म्हटलं.

“धोनी खेळत नसेल तर तो मेंटॉरच्या भूमिकेत असेल, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. धोनी आगामी हंगामात मेंटॉर कम प्लेअरच्या भूमिकेत असेल”, असंही उथप्पा याने सांगितलं.