AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs RR : राजस्थानचा हल्लाबोल, पंजाबचा विजयरथ रोखला, 6 विकेट्सने धुव्वा

Punjab Kings vs Rajasthan Royals Match Result, IPL 2026 : राजस्थान रॉयल्स न्यू चंडीगममधील स्टेडियममध्ये सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारी टीम ठरली आहे. पंजाबने या सामन्यात राजस्थान रॉयल्ससमोर 223 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

PBKS vs RR : राजस्थानचा हल्लाबोल, पंजाबचा विजयरथ रोखला, 6 विकेट्सने धुव्वा
Yashasvi Jaiswal and Donovan Ferreira RR vs PBKSImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 29, 2026 | 3:03 AM
Share

रियान पराग याच्या नेतृत्वात अखेर राजस्थान रॉयल्स पंजाब किंग्सचा विजयरथ रोखण्यात यशस्वी ठरली आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 39 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. राजस्थान यासह आयपीएल स्पर्धेत आपल्या तिसऱ्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करण्यात यशस्वी ठरली आहे. पंजाबने राजस्थानसमोर 223 धावांचं आव्हान ठेवलं होतं. राजस्थानने हे आव्हान 4 बॉलआधी आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. राजस्थानने 19.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 228 धावा केल्या. राजस्थानने अशाप्रकारे या मोसमातील एकूण सहावा विजय मिळवला. राजस्थानचा हा न्यू चंडीगडमधील पंजाब विरुद्धचा तिसरा विजय ठरला. तर पंजाबला या मोसमात 8 व्या सामन्यानंतर पहिल्या पराभवाची चव चाखावी लागली.

सामन्याचा आढावा

राजस्थानने टॉस जिंकल्यानंतर चेजिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पंजाबला नाईलाजाने बॅटिंगसाठी यावं लागलं. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 222 धावांपर्यंत मजल मारली. मार्कस स्टोयनिस याने अखेरच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाबला 13 व्यांदा 200 पेक्षा अधिक धावा करता आल्या. स्टोयनिसने पंजाबसाठी सर्वाधिक आणि नाबाद 62 धावा केल्या. ओपनर प्रभसिमरन सिंह याने 59 धावांचं योगदान दिलं. कूपर कोनोली आणि कॅप्टन श्रेयस अय्यर या दोघांनी 30-30 धावा जोडल्या. तर प्रियांश आर्या याने 29 धावांची खेळी केली. तर राजस्थानसाठी यश राज पुंजा याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

राजस्थानचा विजयी षटकार

राजस्थानच्या विजयात एकूण 6 फलंदाजांनी योगदान दिलं. या 6 च्या 6 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. ओपनर यशस्वी यशस्वी जैस्वाल याने 51 धावा केल्या. यशस्वीने 27 बॉलमध्ये 188.89 च्या स्ट्राईक रेटने 51 रन्स केल्या. यशस्वीने या दरम्यान 1 सिक्स आणि 7 फोर लगावले. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली.

वैभवने 16 बॉलमध्ये 268.75 च्या स्ट्राईक रेटने 43 रन्स केल्या. वैभवने या दरम्यान 5 सिक्स आणि 3 फोर लगावले. ध्रुव दुरेल याने 16 तर कॅप्टन रियान पराग याने 29 धावा जोडल्या. रियानची ही या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. तर डोनोवन फेरेरा आणि शुभम दुबे या दोघांनी धमाका केला. डोनोवन आणि शुभम या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद भागीदारी करत राजस्थानला विजयी केलं.

स्कोअरकार्ड

डोनोवन आणि शुभम या दोघांनी 32 बॉलमध्ये 77 रन्सची पार्टनरशीप केली. डोनोवन याने 26 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 52 रन्स केल्या. डोनोवने या दरम्यान 3 सिक्स आणि 6 फोर लगावले. तर शुबमने 12 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 31 रन्सची खेळी केली आणि राजस्थानच्या विजयात योगदान दिलं. पंजाबसाठी युझवेंद्र चहल याने 3 विकेट्स मिळवल्या. अर्शदीप सिंह याने 1 विकेट मिळवली. तर इतरांना काही करता आलं नाही.

Follow Us
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...