AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : मुंबईला विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये किती फायदा?

IPL 2026 Points Table : रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर मुंबईने लखनौ विरुद्ध सुरक्षित विजय मिळवला. मुबईचा हा 19 व्या मोसमातील वानखेडे स्टेडियममधील सलग 4 पराभवानंतर पहिला विजय ठरला.

IPL 2026 Points Table : मुंबईला विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये किती फायदा?
Mumbai Indians FansImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 05, 2026 | 8:23 AM
Share

मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात वानखेडे स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्सवर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबईने विजयासाठी मिळालेलं 229 धावांचं आव्हान हे 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मुंबईने अशाप्रकारे 19 व्या मोसमातील एकूण तिसरा विजय मिळवला. मात्र मुंबईला या विजयासाठी प्रचंड प्रतिक्षा करावी लागली. मुंबईचा हा वानखेडेतील या मोसमातील 5 सामन्यांमधील सलग 4 पराभवानंतर पहिला विजय ठरला. तसेच मुंबईचा एकूण तिसरा विजय ठरला. मुंबईला सलग 3 पराभवानंतर विजयाची चव चाखता आली. मुंबईला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये किती फायदा झाला आहे हे जाणून घेऊयात.

पॉइंट्स टेबलमध्ये स्थिती जैसे थे

मुंबईने या विजयासह प्लेऑफमधील आपलं जर तरचं आव्हान कायम राखलंय. तर पराभवामुळे लखनौच्या अडचणीत वाढ झाली आहे. लखनौचीही प्लेऑफबाबत मुंबईसारखीच स्थिती झाली आहे. मुंबई विरुद्ध लखनौ सामन्याच्या निकालानंतरही पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुंबई आणि लखनौ दोन्ही संघ पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या आणि दहाव्या स्थानी कायम आहेत.

पलटण आणि लखनौची कामगिरी

मुंबईच्या खात्यात आता 3 विजयानंतर एकूण 6 गुण झाले आहेत. मुंबई नवव्या स्थानी विराजमान आहे. मात्र मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचायचं असले तर कोणत्याही स्थितीत उर्वरित सर्व सामने हे मोठ्या फरकाने जिंकायचा प्रयत्न करावा लागणार आहे. मुंबईच्या हातात आता हाच एकमेव आणि शेवटचा पर्याय आहे. तर लखनौने 9 सामन्यानंतर 7 सामने गमावले आहेत. तर 2 सामने जिंकून 4 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे लखनौने उर्वरित 5 सामने जिंकले तरी त्यांना इतर संघांवर अवलंबून रहावं लागणार आहे.

मुंबई आणि लखनौचा नेट रनरेट

मुंबईला या विजयानंतर 2 गुणांसह नेट रनरेटमध्येही काही प्रमाणात फायदा झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईचा नेट रनरेट हा आता -0.649 असा झालाय जो सामन्याआधी -0.803 असा होता. तर लखनौचा नेट रनरेट हा सामन्याआधी -1.106 असा होता जो पराभवानंतर -1.076 असा झाला आहे.

मंगळवारी दिल्ली विरुद्ध चेन्नई आमनेसामने

दरम्यान मंगळवारी 5 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात अटीतटीचा सामना होणार आहे. अरुण जेटली स्टेडियममध्ये सामन्याचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांची सारखीच स्थिती आहे. दिल्ली आणि चेन्नईने 9 पैकी 4 सामने जिंकले आहेत. चेन्नई सहाव्या आणि दिल्ली सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. अशात आता मंगळवारी कोणता संघ 2 गुण मिळवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर