
आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची गेल्या वर्षी 2025 साली 17 वर्षांची प्रतिक्षा संपली. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने आयपीएल 18 व्या मोसमातील (IPL 2025) अंतिम सामन्यात श्रेयस अय्यर याच्या पंजाब किंग्सला पराभूत केलं. रजतने यासह आरसीबाला पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन केलं. यासह विराट कोहली, आरसीबी फ्रँचायजी आणि चाहत्यांचं आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. आता आरसीबी 19 व्या मोसमात (IPL 2026) गतविजेता म्हणून उतरणार आहे. त्यामुळे आरसीबीसमोर ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. आयपीएलकडून या 19 व्या मोसमाचं 11 मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. प्रत्येक संघाला या पहिल्या टप्प्यात किमान 3 सामने खेळायला मिळणार आहेत. या निमित्ताने आपण आरसीबीचं पहिल्या टप्प्यात कधी आणि कुणाविरुद्ध सामने होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
आरसीबी पहिल्या टप्प्यात एकूण 4 सामने खेळणार आहे.आरसीबीचे या 4 पैकी 2 सामने घरच्या मैदानात होणार आहेत. तर आरसीबीला उर्वरित 2 सामने हे प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळावे लागणार आहेत. आरसीबी मोहिमेतील पहिलाच सामना 28 मार्च रोजी शनिवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे. आरसीबीसमोर पहिल्या फेरीत सनराजयर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे. आरसीबी आपल्या मोहिमेतील पहिले 2 सामने घरच्या मैदानात खेळणार आहे. तर त्यानंतर आरसीबाला पहिल्या टप्प्यातील शेवटच्या 2 सामन्यांमध्ये राजस्थान आणि मुंबई या संघांच्या घरच्या मैदानात क्रिकेट सामने खेळावे लागणार आहेत. या निमित्ताने कोणता सामना कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
पहिला सामना, 28 मार्च, विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, बंगळुरु
दुसरा सामना, 5 एप्रिल, विरुद्ध सीएसके, बंगळुरु
तिसरा सामना, 10 एप्रिल, विरुद्ध राजस्थान रॉयल्स, गुवाहाटी
चौथा सामना, 12 एप्रिल, विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई
आयपीएल 2026 साठी आरसीबी टीम : रजत पाटीदार (कर्णधार), टीम डेव्हीड, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिलीप सॉल्ट, जितेश शर्मा, जेकब बेथेल, कृणाल पंड्या, रोमारीयो शेफर्ड, जोश हेझलवुड, रसिक सलाम दार, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, स्वप्नील सिंग, यश दयाल, नुवान तुषारा, व्यंकटेश अय्यर, जेकब डफी, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान, अभिनंदन सिंग, विकी ओस्तवाल आणि सात्विक देसवाल.