AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs CSK : आरसीबीचा सलग दुसरा विजय, यलो आर्मीचा 43 धावांनी धुव्वा, चेन्नईची पराभवाची हॅट्रिक

Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings Match Result : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा 43 धावांनी धुव्वा उडवत 19 व्या मोसमातील सलग दुसरा विजय नोंदवला.

RCB vs CSK : आरसीबीचा सलग दुसरा विजय, यलो आर्मीचा 43 धावांनी धुव्वा, चेन्नईची पराभवाची हॅट्रिक
Virat Kohl and Bhuvneshwar Kumar RCB vs CSKImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 06, 2026 | 2:49 AM
Share

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातही (IPL 2026) आपला दबदबा कायम ठेवला आहे. आरसीबीने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात रविवारी 5 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सवर एकतर्फी फरकाने विजय मिळवला आहे. आरसीबीने यासह आपली विजयी घौडदोड सुरु ठेवली आहे. आरसीबीने सीएसकेसमोर 251 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात चेन्नईनेही विजयी धावांचा पाठलाग करताना पूर्ण जोर लावला. मात्र टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी पडल्याने यलो आर्मी विजयापर्यंत पोहचण्यात अपयशी ठरली. चेन्नईला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. आरसीबीने चेन्नईसमोर 19.4 ओव्हरमध्ये गुडघे टेकले. आरसीबीने यलो आर्मीला 207 रन्सवर ऑलआऊट केलं आणि 43 धावांनी विजय मिळवला. आरसीबीचा हा सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला.

आरसीबीने सांघिक कामिगिरीच्या जोरावर हा विजय मिळवला. मात्र सर्वाधिक योगदानाबाबत बोलायचं झालं तर टीम डेव्हीड आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी धमाका केला. टीमने आधी 70 धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमार याने सर्वाधिक 3 विकेट्स घेत चेन्नईला ऑलआऊट करण्यात सर्वाधिक योगदान दिलं.

सामन्यात काय झालं?

चेन्नईने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी बोलावलं. आरसीबीच्या फलंदाजांनी या संधीचा फायदा घेतला. आरसीबीसाठी पहिल्या 5 फलंदाजांनीच धमाका केला आणि टीमला 250 धावांपर्यंत पोहचवलं. आरसीबीसाठी टीम डेव्हीड आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनी अर्धशतक झळकावलं. तर फिलिप सॉल्ट, विराट कोहली आणि रजत पाटीदार या तिघांनीही कडक बॅटिंग केली.

टीम डेव्हीड याने फक्त 25 बॉलमध्ये नॉट आऊट 70 रन्स केल्या. टीमने या खेळीत 8 सिक्स आणि 3 फोर ठोकले. देवदत्तने 29 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 5 फोरसह 50 रन्स केल्या. रजतने 19 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. रजतने या खेळीत 6 सिक्स आणि 1 फोर लगावला. ओपनर फिलिप सॉल्टने 46 आणि विराट कोहली याने 28 धावांचं योगदान दिलं.

चेन्नईची बॅटिंग

चेन्नईच्या टॉप ऑर्डनरने आरसीबीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. संजू सॅमसन याने 9 तर कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने 7 धावा केल्या. आयुष म्हात्रे याने 1 आणि कार्तिक शर्मा याने 6 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर लोअर मिडल आणि लोअर ऑर्डरमधील फलंदाजांनी दिलेल्या झुंजीमुळे चेन्नईला शेवटपर्यंत लढा देता आला.

स्कोअरकार्ड

चेन्नईसाठी सर्फराज खान याने सर्वाधिक धावा केल्या. सर्फराजने 25 बॉलमध्ये 50 रन्स केल्या. सर्फराजचं हे आयपीएल कारकीर्दीतील दुसरं अर्धशतकं ठरलं. प्रशांत वीर याने 43 तर जेमी ओव्हरटन याने 37 रन्स केल्या. तर इतरांना 20 पारही पोहचता आलं नाही. आरसीबीसाठी भुवनेश्वर कुमार याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. जेकब डफी, अभिनंदन सिंह आणि कृणाल पंड्या या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर सुयश शर्मा याने 1 विकेट मिळवत इतरांना चांगली साथ दिली.

Follow Us
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....
महाराष्ट्र हादरलं! रविवारची रात्र ठरली काळरात्र; 3 अपघातांत 17 जणांचा
महाराष्ट्र हादरलं! रविवारची रात्र ठरली काळरात्र; 3 अपघातांत 17 जणांचा.
10 दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; पेट्रोल-डिझेलने गाठला उच्चांक, नविन दर काय
10 दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; पेट्रोल-डिझेलने गाठला उच्चांक, नविन दर काय.
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक.
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय.....
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय......
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते.....
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते......