RCB vs LSG : बंगळुरुचा विजयी तडाखा कायम, लखनौचा 5 विकेट्सने धुव्वा, विराट चमकला

Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Match Result IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2025 नंतर पुन्हा एकदा लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवला आहे. आरसीबीचा 19 व्या मोसमातील हा चौथा विजय ठरला आहे.

RCB vs LSG : बंगळुरुचा विजयी तडाखा कायम, लखनौचा 5 विकेट्सने धुव्वा, विराट चमकला
Virat Kohli RCB vs LSG
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 16, 2026 | 1:52 AM

रजत पाटीदार याच्या नेतृत्वात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आपला विजयी तडाखा कायम ठेवला आहे. आरसीबीने स्पर्धेच्या 23 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर एकतर्फी विजय मिळवला. आरसीबीने लखनौचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. पाहुण्या लखनौने एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीसमोर 147 धावांचं तुलनेत सोप असं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 29 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. आरसीबीने 15.1 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 149 धावा केल्या. आरसीबीच्या या विजयात अनुभवी फलंदाज विराट कोहली (इम्पॅक्ट प्लेअर) याने बॅटिंगने सर्वाधिक योगदान दिलं. तर 5 च्या इकॉनमीने चिवट बॉलिंग करत 20 धावांच्या मोबदल्यात 1 विकेट मिळवणारा जोश हेझलवूड मॅन ऑफ मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला.

लखनौ सुपर जायंट्सची बॅटिंग

आरसीबीने टॉस जिंकून लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं. लखनौकडून फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. लखनौसाठी ओपनर मिचेल मार्श याने सर्वाधिक 40 धावा केल्या. गेल्या सामन्यातील मॅचविनर मुकुल चौधरी याने 39 धावांचं योगदान दिलं. आयुष बडोनी याने निर्णायक 38 धावा जोडल्या. तर एडन मार्करम याने 12 धावांची खेळी केली. तर इतर फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. आरसीबीसाठी रसीख सलमान डार याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. भुवनेश्वर कुमार याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कृणाल पंड्या याने फिरकीच्या जोरावर 2 विकेट्स मिळवल्या. तर जोशने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

आरसीबीचा लखनौ विरुद्ध घरच्या मैदानात पहिला विजय

आरसीबीचा ओपनर 7 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनी 34 बॉलमध्ये 57 रन्सची पार्टनरशीप केली. देवदत्तने 10 धावा केल्या. विराटला अर्धशतक करण्याची संधी होती. मात्र विराटचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकलं. विराटने 49 धावा केल्या. कॅप्टन रजत पाटीदार याने 27 रन्स केल्या. तर जितेश शर्मा याने 23 धावांचं योगदान दिलं.

स्कोअरकार्ड

रोमरियो शेफर्ड आणि टीम डेव्हीड या जोडीने आरसीबीला विजयी केलं. दोघांनी सेम टु सेम धावा केल्या. या दोघांनी प्रत्येकी 8 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारसह 175 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 14 रन्स केल्या. लखनौसाठी प्रिन्स यादव याने 3 विकेट्स मिळवल्या. तर आवेश खान याने 2 विकेट्स घेतल्या.

Follow Us