AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs LSG Toss : आरसीबी टॉसचा बॉस, कॅप्टन रजतचा बॉलिंगचा निर्णय, विराट Playing 11 मधून आऊट

Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants and Playing 11: गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने घरच्या मैदानात अर्थात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आहे.

RCB vs LSG Toss : आरसीबी टॉसचा बॉस, कॅप्टन रजतचा बॉलिंगचा निर्णय, विराट Playing 11 मधून आऊट
Rajat Patidar RCB vs LSG TossImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 15, 2026 | 7:40 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 23 व्या सामन्यात होम टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील एकूण पाचवा आणि एकमेकांविरूद्धचा पहिला सामना आहे. रजत पाटीदार याच्याकडे आरसीबीच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर ऋषभ पंत लखनौचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन रजतने घरच्या मैदानात चेजिंग करण्याचा निर्णय घेत लखनौला बॅटिंगसाठी बोलावलं आहे.

दोन्ही संघांची कामगिरी

लखनौची या मोसमातील आतापर्यंत कामगिरी 50-50 अशी राहिली आहे. लखनौने ऋषभ पंत याच्या कॅप्टन्सीत 2 सामने जिंकले आहेत. तर लखनौला 2 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. तर बंगळुरुने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत.

प्लेइंग ईलेव्हनबाबत अपडेट

लखनौने आरसीबी विरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. लखनौ त्याच 11 खेळाडूंसह खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आरसीबीने एकमेव बदल केला आहे. जोश हेझलवूड याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे जेकब डफी याला बाहेर व्हावं लागलं आहे.

विराट कोहली इम्पॅक्ट प्लेअर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे. यासह विराटची आयपीएल स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्यामुळे विराट इम्पॅक्ट सोडण्यात यशस्वी ठरणार का याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

बंगळुरुतील 2025 पासूनची आकडेवारी

दरम्यान बंगळुरुत आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण 7 सामने खेळवण्यात आले आहेत. या 7 पैकी 3 सामन्यांमध्ये पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर 4 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने सामना जिंकला आहे.

स्कोअरकार्ड

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मोहम्मद शमी, आवेश खान, दिग्वेश सिंग राठी आणि प्रिन्स यादव.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, सुयश शर्मा आणि रसिक सलाम दार.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...