AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : तेव्हा बसले होते दाढी खाजवत, शेपूट हलवत, अरे उठून… मराठीवर बोलताना उद्धव ठाकरेंचा संताप, शिंदेंना घेरलं

एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि अमित शाह याच्यापुढे लाचारीचे धोरण स्वीकारल्याने त्यांना वाटतं की, संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश हा लाचारांचा प्रदेश आहे, पण असं नाही हा महाराष्ट्र महापुरुषांचा आहे, असं उद्धव ठाकरेंनी त्यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात म्हटलं आहे.

Uddhav Thackeray : तेव्हा बसले होते दाढी खाजवत, शेपूट हलवत, अरे उठून... मराठीवर बोलताना उद्धव ठाकरेंचा संताप, शिंदेंना घेरलं
Shivsena ubt dasara melava 2026Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 20, 2026 | 9:20 PM
Share

एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरवर सुरु आहे. तर दुसरीकडे शिवाजी पार्कात परंपरेनुसार उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा दसरा मेळावा पार पडलाय. यावेळी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, एकनाथ शिंदे यांच्या नावांचा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शाह आले. त्याआधी भैया जोशी का कोण येऊन सांगून गेले की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. अमित शाह हे आले अन् म्हणाले महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे. त्यावेळी आमचे बसले होते दाढी खाजवत, शेपूट हलवत, सत्तालंपट साले, अरे उठून ताडकन सांगायचं होतं, की बहुभाषिक वगैरे काही नाही, हा मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहु फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. पण शेपूट काढली आणि हलली नाही आणि मग कापली गेली तर… असे हे शेपूटघाले आम्हाला हिंदूत्व शिकवणार का? असा घणाघात उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केला आहे.

आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवू नका, हेच अमित शाह गुजरातेत बोलतात की, गुजरातमध्ये हिंदी बोलली जात नाही. तमिळनाडूमध्ये गेल्यावर नमस्कार करुन सांगतात की मला माफ करा कारण मला तमिळ बोलता येत नाही, पण महाराष्ट्रात मात्र हे सगळे लाचार त्यांना मिळालेले असल्याने त्यांना वाटतं की, सगळा महाराष्ट्र प्रदेश हा लाचारांचा प्रदेश आहे, पण असं अजिबात नाही. तुम्ही मतचोरी करुन सत्तेवर आलेले आहात. पण तुमच्यात हिमंत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणात काय उत्तर देतात याकडे लक्ष लागलं आहे, पण शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली तेव्हा फक्त दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचं म्हटलं आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!